खालील लिंक वर क्लिक करा
काय आहे चेकमेट ग्रुप?
— Checkmate Times (@checkmate_times) April 13, 2023
पुण्याच्या राजकीय घटना
पुण्याच्या गुन्हेगारी
पुण्याचे कार्यक्रम
पुण्याची वाहतुक
पुण्याचे पर्यावरण
आणि सर्व सदस्यांचे आवडते ‘चेकमेट क्विझ’
अशी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चेकमेट ग्रुपचे सहभागी व्हाhttps://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महापालिकेतील (Pune) कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या करण्यासाठी प्रशासनाला सवड मिळाली आहे. 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या (Pmc Transfers) केल्यानंतर सहा संवर्गातील 646 सेवकांच्या बदल्या करण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासन अधिकारी (Administration Officer), उपअधीक्षक (Deputy Superintendent), लिपिकांचा (Clerks) समावेश आहे. पुढच्या आठवड्यात या बदल्या (Transfers) केल्या जाणार आहेत.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार (Pune Municipal Service Regulations), एकाच खात्यात तीन वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांची दुसऱ्या खात्यात बदली होणे आवश्यक आहे. त्यासाठी खात्यामध्ये काम करणाऱ्या एकूण पदांपैकी दरवर्षी 20 टक्केच बदल्या करण्यात येतात. पण, गेल्या अनेक वर्षांपासून बदल्याच झालेल्या नाहीत. यामध्ये राजकीय वरदहस्त असलेले व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी महत्त्वाच्या टेबलवर आहेत. त्यांच्या बदल्या न झाल्याने प्रशासकीय कामातही अडसर निर्माण होत आहे. (PMC Transfers)
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे काम हे सामान्य प्रशासन विभागाकडून केले जाते. पण याच विभागात अनेक कर्मचारी जवळपास 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. महत्त्वाच्या टेबलांवर त्यांचीच वर्णी असून, त्यांच्याशिवाय अधिकाऱ्यांकडे फाइल जात नाहीत. त्यामुळे या बदल्यांमध्ये प्राधान्याने या विभागातील बदल्या झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी खासगीत व्यक्त करत आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर ते ज्या खात्यात काम करतात तेथूनच पगार निघाला पाहिजे. पण विभाग प्रमुख, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील अनेक कर्मचारी आहेत की ज्यांची बदली झाली तरी ते या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच कार्यालयात काम करत असतात. पण त्यांचा पगार दुसऱ्या खात्याकडून काढला जातो. आयुक्त कार्यालयातही तीन वर्ष उलटून गेले तरीही तेथील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. (PMC Transfers)
हेही वाचा -
31 मार्च 2023 अखेर एकाच खात्यात तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या प्रशासन अधिकारी, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक व अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता या पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेला आहे. महापालिकेत बदल्या करण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची टीका झाल्याने अखेर प्रशासनाने बदल्या करण्याचे काम सुरू केले आहे. यावर पुढील आठवड्यात कार्यवाही होणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84