Type Here to Get Search Results !

Autocross: फास्टर ड्रायव्हरसह निकिता टकले हिने नऊ ट्रॉफी पटकविल्या; ऑटो क्रॉस लोणावळा

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

nikita takale khadsare won fastest driver in autocross lonavala - checkmate times

पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मुंबई पुणे एक्सप्रेस (Mumbai Pune Express HIghway) लोणावळा (Lonawala) जवळील नानोली (Nanoli) मध्ये इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस (Indian National Auto Cross 2023) आयोजित ऑटो क्रॉस मध्ये पुण्याच्या निकिता टकले खडसरे (Nikita Takale Khadsare) हिने फास्टर ड्रायव्हर (Faster Driver of The Year) व विविध गटात नऊ ट्रॉफी पटकविल्या. यामध्ये ट्रॅकवर माती, दगड असताना कमी वेळ नोंदविताना गाडीवरील नियंत्रण ठेवण्याचा निकिताचा प्रयत्न यशस्वी ठरला.

हंगामातील पहिल्या इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस 2023 मध्ये मुंबई, पुणे, गोवा, बेंगलोर, चिकमंगलूर, हैद्राबाद अशा अनेक भागातून 40 च्या आसपास कार ऑटो क्रॉस स्पर्धक (Auto Cross Riders) सहभागी झाले होते. या दोन दिवसीय ऑटो क्रॉस मध्ये मिळून 14 हून अधिक गटाच्या स्पर्धा होत्या. दिग्गज रायडर या ऑटो क्रॉस मध्ये सहभागी झालेले असताना नवख्या निकिताने तब्बल नऊ ट्रॉफी पटकविल्या.

यामध्ये 1 मिनिट 13 सेकंद सर्वात कमी वेळ घेऊन फास्टर ड्रायव्हरची ट्रॉफीही मिळविली. देशातील व परदेशातील अनेक रायडर (International Auto Cross Riders) रॅलीत सहभागी होत असताना पुण्यात ऑटो क्रॉस होत असल्याने दडपण होते. मात्र गुरु चेतन शिवराम, निकिताचे वडिल उद्योजक नितीन टकले (Nitin Takale) व आईने मार्गदर्शन केल्याने या रॅलीत चांगला परफॉर्मन्स दाखविल्याचे निकिता टकले खडसरेने आवर्जून सांगितले.

हेही वाचा - डिफेन्स सिविलीयन पैलवान निलेश वांजळे यांना रौप्य पदक

आजवर भारतात अनेक कार रॅली मध्ये सहभाग नोंदविताना निकिताने अनेक पारितोषिके मिळविली आहेत. आगामी हैद्राबाद ऑटो क्रॉस (Hyderabad Auto Cross), अरुणाचल रॅली (Arunachal Rally) मे मध्ये होणार आहे या रॅलीत निकिता पुणे महाराष्ट्रातून (Maharashtrian Auto Cross Rider) सहभाग घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नाव उज्वल करणार असल्याचे निकिताने सांगितले. तसेच इंडोनेशिया (Indonesia) मध्ये होणाऱ्या एशिया पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिप (Asia Pacific Rally Championship, Indonesia) मध्ये भारतातून एकमेव महिला म्हणून निकिता प्रतिनिधित्व करणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.