Type Here to Get Search Results !

Warje Malwadi: 24X7 पाणीपुरवठा लाईन मध्ये शिरत आहेत उंदीर, घुशी आणि मांजर सुद्धा; प्रशासनाचे दुर्लक्ष्य?

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

open pipeline in warje malwadi gokulnagar area - checkmate times

पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून पुणे शहराला बंद पाईप लाईन मधून 24X7 पाणीपुरवठा (pune 24x7 water supply project) करण्यासाठी शहरभर नवीन जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येते आहे. मात्र त्यातील काही ठिकाणी प्रशासन (PMC Administration) आणि ठेकेदार कंपनीचे (Contractor Company) अक्षम्य दुर्लक्ष्य होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील गोकुळनगर पठार (Gokulnagar Pathar) भागात अशी एक तब्बल 6 इंच व्यासाची जलवाहिनी गेल्या चार दिवसांपासून खोदून उघडी (Open Water Line) ठेवण्यात आलेली आहे. त्यात बाजूला असलेल्या कचरा, गटारातून दिवसभर फिरत असलेले उंदीर (Rat), घुशी आणि त्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या मागे लागलेल्या मांजरी (Cat) त्या जलवाहिन्यांमध्ये घुसत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर भविष्यात या जलवाहिन्यांमधून येणारे पाणी कितपत शुद्ध (filtered water) असेल याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

त्यामुळे जर भविष्यात पुणे महानगरपालिका मीटर प्रमाणे पैसे घेऊन पाणी देणार असेल, तर त्याचा दर्जा देखील तेवढाच चांगला राहील याची काळजी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने, पाणीपुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) घ्यायला नको का? जर या उघड्या जलवाहिन्यांमधून आत प्रवेशकर्ते झालेले प्राणी आतच मृत झाल्यास आणि नंतर त्यातून पाणी सोडले जाऊन, त्या पाण्याचे सेवन केल्याने जीवितहानी झाली, कोणती मोठी रोगराई पसरली तर त्याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशी अक्षम्य चूक झालेली असताना, यावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - Warje Police: वारजे मध्ये पोलिसांचा लाँग मार्च; संवेदनशील भागात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी शक्तीप्रदर्शन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.