Type Here to Get Search Results !

Pune Crime: पुन्हा पुणे मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

passenger assaulted in pune mumbai sinhagad express - checkmate times

पुणे, दि. 26 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये जुन्या पासधारकांची मुजोरी सुरूच असून सोमवारी पुन्हा जागेच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड (Police Inspector Rajendra Gaikwad) यांनी माहिती दिली.

संदीप गोंदेगावे (वय 37, रा. वरळे, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव असून त्यांनी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हे सोमवारी सकाळी सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये लोणावळा येथील नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढले. तेथे एक जागा रिकामी दिसल्याने तेथे त्यांनी बसण्याचा प्रयत्न केला. पण, येथे बसलेल्या प्रवाशांनी त्यांच्या सहकाऱ्यासाठी जागा अडवून ठेवली होती. संदीप यांनी विनंती केली असता, यावेळी त्या सात प्रवाशांनी वाद घालत मारहाण केली. त्यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.


दरम्यान, जुने पासधारक ट्रेनमध्ये दादागिरी करून जागा अडवून ठेवतात. तसेच ग्रुपमध्ये बसून पत्त्यांचा डाव मांडतात. नवीन पासधारकांना बसायला जागा देत नाहीत. रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारवाई करून जुन्या पासधारकांची मुजोरी मोडीत काढावी, अशी मागणी केली.

“रेल्वे प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे जुन्या पासधारकांची मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे. आरपीएफ आणि टीसी यांनी सरप्राइज व्हिजिट करून दोषीवर कारवाई करावी.” असे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निखिल काची म्हणाले.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.