Type Here to Get Search Results !

PMC : दुसऱ्याच्या लायसनवर हातगाडी, टपऱ्या भाड्याने घेतल्या असतील तर आताच सावध व्हा

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pmc action against hawkers renting space - checkmate times

पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर (Rent) देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक अशा पद्धतीचे काम करत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (Municipal Encroachment Department) शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट (Certificate) देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने अशा पथारीधारकांवर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया

क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap, Deputy Commissioner of Municipal Encroachment Department) यांनी दिली.

याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि,”अशा फेरीवाल्यांना अगोदर समज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आता ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे.” असेही माधव जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा 'आमच्याकडे लायसन्स आहे, वेळ वाया घालवू नका!'; असा पुण्यातील वाहतुक पोलिसांना टोमणा

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.