खालील लिंक वर क्लिक करा
काय आहे चेकमेट ग्रुप?
— Checkmate Times (@checkmate_times) April 13, 2023
पुण्याच्या राजकीय घटना
पुण्याच्या गुन्हेगारी
पुण्याचे कार्यक्रम
पुण्याची वाहतुक
पुण्याचे पर्यावरण
आणि सर्व सदस्यांचे आवडते ‘चेकमेट क्विझ’
अशी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चेकमेट ग्रुपचे सहभागी व्हाhttps://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): कचरा वाहतुकीच्या नावाखाली (Waste Transport) कोट्यवधींची बोगस बिले (Bogus Bills) काढणार्या ठेकेदारावर महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळल्याने या ठेकेदाराकडून अनामत रकमेतून दहा टक्के दंडासह 2 कोटी 30 लाख वसूल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार (Additional Commissioner Dr. Kunal Khemanar) यांनी दिले आहेत.
महापालिकेने वर्गीकरण केलेला कचरा डोअर टू डोअर पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयापर्यंतच्या रॅम्पपर्यंत वाहतूक करण्यासाठी मार्च 2016 मध्ये निविदा काढली होती. हे काम स्वयंभू ट्रान्सपोर्ट (Swayambhu Transport) या ठेकेदाराला मिळाले होते. वाहनांच्या फेर्यानुसार ठेकेदाराला बिल अदा करण्याचे ठरले होते. मात्र, या कामात ठेकेदाराने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने कोट्यवधींची बोगस बिले काढली होती.
कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन असतानाही कचरा वाढलेला दाखवून बिले काढली. वाहनांना जीपीएस बंधनकारक असून, जीपीएस नसतानाही कचरा वाहतुकीच्या वाहनांच्या फेर्या दाखवून बिले काढण्यात आली. एकाच वाहनाची एकाच कालावधीत दोन ठिकाणी वेगवेगळी बिले काढून पालिकेची फसवणूक करण्यात आली. महापालिकेची वाहने वापरून त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही पालिकेच्या माथी मारला होता.
आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. प्रशासनाने केलेल्या चौकशीत कचरा वाहतुकीच्या निविदा अटी-शर्तीचे पालन झाले नसल्याचे आढळून आले. प्रामुख्याने एकाच क्रमांकाच्या वाहनाने वर्षभर दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या (Regional Offices) हद्दीत कचरा वाहतूक केल्याचे दाखवून खोटी बिले काढली असल्याचे चौकशीत आढळून आले. तसेच, जीपीआरएसमध्ये दोन फेर्या असताना पाच फेर्या दाखवून त्यानुसार बिले काढण्यात आल्याच्या तक्रारीत हे तथ्य आढळून आले.
वाहतुकीसाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट यांनी वापरलेल्या वाहनांचा विमा न उतरवणे (No Vehicle insurance), आरटीओ टॅक्स न भरणे (No RTO Tax) आणि आरटीओ फिटनेस प्रमाणपत्र न घेणे, (No RTO Fitness Certificate) महापालिकेची जी वाहने वापरली त्याचीही देखभाल-दुरुस्ती न करता ती परत करून पालिकेलाच (PMC) आर्थिक भुर्दंड दिला असल्याचे आढळून आले. मात्र, लॉकडाऊनमध्ये शहर बंद असताना काढण्यात आलेली बिले आणि वाहनांच्या तुलनेत वाढलेल्या बिलांची रक्कम यात तथ्य नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ही रक्कम पुढीलप्रमाणे वसूल केली जाईल -
1) पालिकेच्या वापरलेल्या वाहनांची देखभाल-दुरुस्ती खर्च : 70 लाख 80 हजार 45 रुपये इतकी रक्कम आकारण्यात आली असून, ती वसूल करण्यात आली.
2) एकाच वाहनाचा दोन ठिकाणी वापर दाखवून बिले काढणे : 16 लाख 11 हजार 634 रुपये.
3) जीपीएस यंत्रणा न बसविता कचरा वाहतूक करणे : 13 लाख 49 हजार 355 रुपये.
4) विमा, फिटनेस नसताना वाहन वापरणे : 1 कोटी 9 लाख 38 हजार 283 रुपये.
असा एकूण 2 कोटी 9 लाख 39 हजार 317 रुपये वसूल करण्यात येणार असून, त्यावर 10 टक्के दंडाची रक्कम 20 लाख 97 हजार 934 अशी एकूण 2 कोटी 30 लाख 77 हजार 251 रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा -
कचरा वाहतूक करताना ठेकेदाराने महापालिकेच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. तसेच, महापालिकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचेही या चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, महापालिका प्रशासन या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. याउलट ठेकेदाराला नव्याने 140 कोटींची कामे दिली आहेत. माहिती अधिकारातून हे प्रकरण उजेडात आणले असून या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Former Congress corporator Datta Bahirat) यांनी सांगितले.
“या प्रकरणाच्या चौकशी अहवालात प्रशासनाने काही ठिकाणी ‘अंशतः तथ्य’ असा शेरा मारल्याचा अर्थ नक्की काय, याचा खुलासा प्रशासनाने करावा. तसेच या प्रकरणात अधिकारी आणि कर्मचारी यांची मात्र चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचीही चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी.” अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन बहिरट आणि बाबा सय्यद (Right to information activists Sachin Bahirat and Baba Syed) यांनी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84