Type Here to Get Search Results !

PMC: पर्यावरण संवर्धनासाठी पुणे महापालिकेला प्लॅटिनम प्रमाणपत्र

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Platinum certificate to PMC for environmental conservation - checkmate times

पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पर्यावरण संवर्धनासाठी शहरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची दखल घेऊन पुणे महापालिकेला प्लॅटिनम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. खासदार अॅड. वंदना चव्हाण (MP Adv. Vandana Chavan) यांच्या हस्ते महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) व पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap, Deputy Commissioner of Environment Department) यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (Confederation of Indian Industries - CII), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (Indian Green Building Council) आणि क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे (Credai Pune Metro) हा सन्मान करण्यात आला. असे प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे राज्यातले पहिले, तर देशातील दुसरे शहर ठरले आहे.

विक्रम कुमार म्हणाले,”पुणे शहर कायमच सर्वांत चांगले राहण्यायोग्य शहर राहील, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे.”

चव्हाण म्हणाल्या,”महापालिकेने पर्यावरण क्षेत्रात चांगले काम केले, याची दखल घेऊन हे प्रमाणपत्र देण्यात आले. हवामानात होणारे बदल हे शहरासमोरचे सर्वांत मोठे आव्हान असून, आपले पर्यावरण आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.”

हेही वाचा -

यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम (Director General of Yashada S. Chokalingam), सीआयआय-आयजीबीसीचे उप कार्यकारी संचालक एम. आनंद (CII-IGBC Deputy Executive Director M. Anand), ग्रीन फॅक्टरी रेटिंग सिस्टीमचे अध्यक्ष प्रदीप भार्गव (Green Factory Rating System President Pradeep Bhargava), आयजीबीसी पुणे शाखेचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ (IGBC Pune Branch President J. P. Shroff), सहअध्यक्ष पूर्वा केसकर (Co-President Purva Keskar), मुख्य समिती सदस्य प्रणती श्रॉफ (Principal Committee Member Pranati Shroff), क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे (Credai Pune Metro Chairman Ranjit Naiknavare), महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर (Director General Dr. D. K. Abhyankar) उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.