कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 7, 2023
भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार कधी झाला?
त्याचे उद्दिष्ट काय होते हे कमेंट करा.
उत्तर उद्या सकाळी 9वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #Nehru #Pakistan #india
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून (Maharashtra Metro Railway Corporation Limited Company) मेट्रोस्थानक स्ट्रक्चरल उभारणीच्या (Structural construction) सदोष कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने, तसेच कंपनीने केलेल्या दुरुस्त्या मान्य नसल्याने कंपनीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका पुण्यातील स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक (Structural Engineer Narayan Kochak) यांनी दाखल केली आहे.
हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया
विविध रेल्वे कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर काम केलेले पुण्यातील चार निवृत्त अधिकारी, हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ (Former Managing Director of Hyderabad Metro Rail Limited Vivek Gadgil), कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले (Former Managing Director of Konkan Railway Corporation Limited Dr. Ketan Gokhale), प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट शिरीष खसबरदार (Project Management Consultant Shirish Khasbardar) आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांनी पुण्यातील मेट्रो स्थानक स्ट्रक्चरचा दर्जा आणि सदोष डिझाइनबाबत काही निरीक्षणे नोंदवीत नाराजी व्यक्त केली होती. महामेट्रो कंपनीने त्रुटी असल्याचे मान्यही केले होते; पण मेट्रो स्थानकाचे स्ट्रक्चर सुरक्षित असल्याचा दावा केला.
मात्र, महामेट्रोचे स्पष्टीकरण समाधानकारक न वाटल्याने स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांनी कंपनीविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कोचक यांनी ॲड. प्रतीक राजोपाध्येय (Adv. Pratik Rajopadhyay), ॲड. आशिष पाटणकर (Adv. Ashish Patankar), ॲड. निखिल डोंगरे (Adv. Nikhil Dongre) आणि ॲड. अमेय रानडे (Adv. Amey Ranade) यांच्यामार्फत ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
हेही वाचा - Pune News: मेट्रोच्या कामामुळे आजपासून वाहतुकीत बदल; आज घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या
नारायण कोचक म्हणाले,”महामेट्रो कंपनीचे स्ट्रक्चर स्थिर असल्याबाबत प्रमाणपत्र दिल्याचे म्हणत आहे. त्यात त्यांनी केलेल्या दुरुस्त्या आम्हाला मान्य नाहीत. कमिशनर ऑफ मेट्रो अँड सेफ्टी (Commissioner of Metro and Safety) यांना पाठविलेल्या पत्रातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. कंपनी बरीच माहिती सुस्पष्टपणे द्यायला तयार नाही. हा पुणेकरांच्या जिवाशी खेळ आहे, म्हणून ही जनहित याचिका दाखल केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84