Type Here to Get Search Results !

Pune Mumbai Highway Accident: आईने घातलेली शपथ आणि स्वामी कृपा यांच्यामुळे तो वाचला?

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Pune Mumbai Highway Bus Accident aaradhya jadhav news - checkmate times

पुणे, दि. 17 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): “मी गाडीत बसलो आणि तितक्यात आईचा फोन आला, मला म्हणाली तुला माझी शप्पथ गेलास तर... म्हणून मी मागे फिरलो आणि सकाळी अपघाताची बातमी पाहिली. तिला मिठी मारून ढसाढसा रडलो.” हे सांगताना गोरेगाव (Goregaon) येथे राहणाऱ्या आराध्य जाधव (वय - 18) (Aaradhya Jadhav) याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. (Pune Mumbai Highway Bus Accident)

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, आराध्यचे अनेक मित्र बाजीप्रभू ढोल-ताशा पथकात होते. तो वादक नसला तरी त्यांच्यासोबत पुण्याला निघाला होता. “माझी आई सुखदा हिने मला परवा जाण्यापासून रोखले. मला अस्वस्थ वाटतेय असे म्हणाली. माझी आजी वारल्याने आम्ही त्या दुःखात आहोत. मी बसमध्ये जाऊन बसलो होतो; पण फोन करून तिने मला परत बोलविले. त्यामुळे मित्रांचा आग्रह मोडून घरी परतलो. रात्रभर आईशी भांडलो. तिने मला जाऊ दिले नाही म्हणून रागावलो होतो. मात्र सकाळी बसच्या अपघाताची बातमी समजताच पायाखालची जमीनच सरकली.”

हेही वाचा -

“अपघाताची बातमी ऐकल्यानंतर आईला मी घट्ट मिठी मारली. आज माझे काय झाले असते, या विचारानेही माझा थरकाप उडाला. मृतांपैकी अनेकजण माझे मित्र होते. त्यांच्यापैकीच एक चेहरा मीदेखील असतो याचा विचारही हादरवून टाकतो. मात्र आईचे ऐकल्यामुळे आज मी सुखरूप आहे.” असे आराध्य म्हणाला.

“आम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहोत त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाला तारले, माझ्या पत्नीमार्फत त्याला अडवले.” असे म्हणत आराध्यचे वडील प्रशांत यांनी हात जोडत देवाचे आभार मानले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.