Type Here to Get Search Results !

Pune-Mumbai highway Bus Accident: या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime,, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 15 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या खासगी बसच्या अपघाताबद्दल (Pune-Mumbai highway Bus Accident) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ (Shingaroba mandir, Borghat) ही घटना घडली. या भीषण अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा -

आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. 

या अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देत जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करुन या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.