Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): एप्रिल ते जूनदरम्यान देशात उष्णतेची लाट येणार असून, त्याचा परिणाम दीर्घकाळ असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) व्यक्त केला आहे. या महिन्याच्या अखेरीस आणि संपूर्ण उन्हाळ्यात शहराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाट असणार आहे. या अंदाजामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागही होरपळून निघणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये पुण्याचाही समावेश असण्याची शक्यता दर्शविली जात आहे.
“शहरातील कमाल तापमान वाढत आहे आणि पुढील 72 तासांपर्यंत ते वाढतच राहील. पण उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत ती तितकी तीव्र नसेल. पुणे शहरावर उष्णतेच्या लाटेचा तात्काळ परिणाम होणार नाही.” असं मत आयएमडी विभाग प्रमुख अनूपम कश्यपी (IMD Department Head Anupam Kashyapi) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र (Maharashtra), मराठवाड्याचा (Marathwada) काही भाग आणि विदर्भातील (Vidarbh) काही जिल्ह्यांसह जवळपास निम्म्या राज्याला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवेल. पुण्यातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे नागरिकांना अतिउष्णतेचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
एप्रिल 2023 मध्ये जो अवकाळी पाऊस येतो त्याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केला असून, त्यामध्ये संपूर्ण देशात या कालावधीत सामान्य पाऊस (88%-112%) होण्याची शक्यता आहे. बहुतेक वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारत तसेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.
हेही वाचा - Pune Police: वाहतुक पोलिसांना वैतागून नागरिकांचा पोलीसांवर वॉच
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84