कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 19, 2023
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढवायला हवी का? आणि कशी?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #watersupply
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): नारायणगाव (Narayan gaon) येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी (Shree Muktabai Devi) व काळोबा देवस्थानच्या (Kaloba Devsthan) यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या (Kushti) आखाड्यात ‘नारायणगाव केसरी’ (Narayangaon Kesari) हा किताब पैलवान राहुल फुलमाळी (Rahul Phulmali) याने पटकवला. यात्रा समितीच्या वतीने रोख एक लाख रुपयांचा इनाम व एक किलो वजनाची चांदीची गदा भेट देऊन मानाचा फेटा बांधून त्याचा सत्कार केला.
बुधवारी (दि. 19 एप्रिल 2023) सायंकाळी सहा ते रात्री सव्वादहा या वेळेत लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाडा रंगला. ‘नारायणगाव केसरी’साठी असलेली मानाची अंतिम कुस्ती राहुल फुलमाळी (पिंपळवंडी) व सचिन सुरनर (Sachin Surnar) (मनमाड) यांच्यात सुमारे अर्धा तास चालली. फुलमाळी याने दुहेरी पट टाकून सुरनर याला चितपट केले. कुस्ती शौकिनांनी टाळ्या वाजवून फुलमाळी यांचे अभिनंदन करून त्याच्यावर रोख बक्षिसाचा वर्षाव केला. या वेळी ‘मुक्ताबाई माते की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्त चोळी पातळ, छबिना, घागरी, पालखी मिरवणूक, शोभेचे दारूकाम, लोकनाटयाचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात्रेनिमित्ताने मंगळवारी (दि. 18 एप्रिल 2023) रात्री मुस्लिम समाजाच्या वतीने शोभेचे दारूकाम केले.
नाशिक, संगमनेर, नगर, सातारा, कोल्हापुर, हरियाना, उत्तरप्रदेश, धाराशिव, भोसरीसह पुणे ग्रामीण भागातील सुमारे दीडशे पैलवानांच्या कुस्त्या आखाड्यात झाल्या. यात्रा समितीच्या वतीने कुस्त्यासाठी वजनी गट तयार केले होते. त्यामुळे निकाली कुस्त्यांचे प्रमाण वाढले. निकाली कुस्त्यांना टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली जात होती.
आखाड्यासाठी साडेसहा लाख रुपयांची रोख बक्षीसे ठेवली होती. अंतिम कुस्तीसाठी सुजित खैरे मित्र परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांचे; तर बैलगाडा मालक राकेश खैरे (Rakesh Khaire) यांच्या वतीने एक किलो वजनाची चांदीची गदा इनाम म्हणून ठेवली होती. रोख पाचशे रुपये ते 51 हजार रुपयांच्या दरम्यान इनाम ठेवण्यात आला होता. 5 हजार, 11 हजार, 15 हजार व 21 हजार रुपये इनामाच्या सुमारे शंभर कुस्त्या निकाली झाल्या. यात्रा समितीचे स्व. दत्तोबा फुलसुंदर (late Dattoba Phulsundar) यांच्या स्मरणार्थ 11 हजार रुपये इनामाच्या दोन कुस्त्या लावण्यात आल्या. 25 हजार रुपये इनामाच्या बागल फुलमाळी (Bagal Fulmali), अजित वाराणसी (Ajit Varanasi), समाधान दगडे (Samadhan Dagade), गोवर्धन (Govardhan), रघुनाथ आव्हाड (Raghunath Aavhad), विजय लोहकरे (Vijay Lohakare), किरण लोहकरे (Kiran Lohkare), अंकित धुळवड (Ankit dhulwad) यांच्यातील कुस्त्या लक्षवेधी झाल्या. आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते सचिन चौधरी व अविनाश मुकुल (Avinath Mukul) यांच्यातील 51 हजार रुपये इनामाची कुस्ती लावण्यात आली. महिला खेळाडूंच्या सहा कुस्त्या निकाली झाल्या.
यात्रा समितीचे प्रमुख व माजी सरपंच योगेश पाटे, संतोष खैरे, एकनाथ शेटे, सुजित खैरे, माजी सरपंच अशोक पाटे, संतोष वाजगे, दादाभाऊ खैरे, मुरलीधर फुलसुंदर, विलास पाटे, राजाराम पाटे, सदानंद खैरे, रामभाऊ तोडकरी, अजित वाजगे, आशिष फुलसुंदर यांनी यात्रेचे नियोजन केले. डी. के. भुजबळ, आशीष माळवदकर, हेमंत कोल्हे, एच. पी. नरसुडे यांनी समालोचन केले. लाल मातीचा कुस्त्याच्या आखाडा तयार करण्यासाठी तेजस पाटे, आकाश कानसकर, जितेंद्र भोर यांनी परिश्रम घेतले.
आखाडा पहण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे, युवा नेते अमित बेनके, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, गुलाबराव नेहेरकर, सरपंच राजेंद्र मेहेर, पुण्याचे माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे, फौजदार राजेश पवार आदी उपस्थित होते.
तर कुस्ती आखाड्यात पंच म्हणून एच. पी. नरसुडे, माजी सरपंच अशोक पाटे, अजित कानडे, राहुल नवले, आशिष कोल्हे, मेहबूब काझी, सुनील ढवळे, साहेबराव गाळव यांनी काम पाहिले. सुरक्षा व्यवस्था सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate), फौजदार सनील धनवे (Faujdar Sunil Dhanve) यांनी पाहिली.
हेही वाचा -
(Head of Yatra Committee and former Sarpanch Yogesh Pate, Santosh Khaire,
Eknath Shete, Sujit Khaire, Former Sarpanch Ashok Pate, Santosh Vajge, Dadabhau
Khaire, Muralidhar Phulsunder, Vilas Pate, Rajaram Pate, Sadanand Khaire,
Rambhau Todkari, Ajit Vajge, Ashish Phulsunder, D. K. Bhujbal, Ashish
Malvadkar, Hemant Kolhe, H. P. Narasude, Tejas Pate, Akash Kanskar, Jitendra
Bhor, Former MP Shivajirao Adharao Patil, MLA Atul Benke, Chairman of Vighnahar
Factory Satyasheel Sherkar, Former MLA Sharad Sonwane, Youth Leader Amit Benke,
President of Sriram Patsanstha Tanaji Dere, Gulabrao Neherkar, Sarpanch
Rajendra Meher, Former Pune Corporator Rajendra Gorde, Faujdar Rajesh Pawar, H.
P. Narasude, former sarpanch Ashok Pate, Ajit Kanade, Rahul Navale, Ashish
Kolhe, Mehboob Kazi, Sunil Dhavale, Sahebrao Galv)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84