कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 6, 2023
राजकारणामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे का?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): येत्या 21 एप्रिल 2023 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे, बालेवाडी येथे रोलबॉलची आंतरराष्ट्रीय स्पर्धा (International Competition) आयोजित करण्यात आली असून स्पर्धेची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पर्धा समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chairman of Competition Committee and Guardian Minister of Pune Chandrakant Patil) यांनी सांगितले.
बुधवारी (5 एप्रिल 2023) मुंबईत ह्या स्पर्धेच्या मानचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), स्पर्धेचे प्रमुख चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन (Sports Minister Girish Mahajan), रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे (Raju Dabhade is the father of Rollball), रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर (Maharashtra State President of Rollball Association Sandeep Khardekar), उपाध्यक्ष ऍड. अमोल काजळे पाटील (Vice President Adv. Amol Kajle Patil), मुंबई रोलबॉल संघटनेचे सचिव जयप्रकाश सिंग (Mumbai Rollball Association Secretary Jaiprakash Singh) आणि चंदन जयस्वाल (Chandan Jaiswal) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री महोदयांना स्पर्धेच्या उदघाट्न व समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले तसेच स्पर्धेला सर्वतोपरी मदत करू असे वचन ही दिले.
आत्तापर्यंत ह्या स्पर्धेसाठी 32 देशांनी सहभाग नोंदविला असून त्यांची व्हिसा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असल्याचे राजू दाभाडे व संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
ह्या स्पर्धेचा जन्म पुण्यात झाला असल्यामुळे व आता तब्ब्ल 57 देशात हा वेगवान खेळ खेळला जात असल्याने त्याची पुण्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे पुण्याचा पालकमंत्री आणि संयोजन समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने माझे कर्तव्य असल्याचे मी मानतो असे मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. ह्या स्पर्धेसाठी क्रीडानगरी मधील बॅडमिंटन हॉल सुसज्ज करत असून जगभरातून येणाऱ्या स्पर्धकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - Cricket: सर्व वस्तूंचे दर वाढत असताना क्रिकेटसाठी पोलीस बंदोबस्त शुल्कात दरवाढ का नाही?
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84