Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाचे नेते अस्वस्थ; खडकवासल्यात सचिन अहिर गरजले

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मागील काही दिवसांपासून विरोधीपक्षनेते अजित पवार भाजपासोबत (Ajit Pawar) जाणार आहेत अशा चर्चा माध्यमांतून ऐकायला मिळत आहेत. पण अजित पवार असा काही निर्णय घेतील अशी अजिबात शक्यता नाही. परंतु आमचा अनुभव पाहता राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader and Pune District Liaison Chief. Sachin Ahir) यांनी सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Gorhe Budruk) येथे बोलताना केले आहे. यावेळी ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गोऱ्हे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनींशी संवाद साधताना अहिर म्हणाले,“सध्या महाविकास आघाडी राज्यातील जनतेचे प्रश्न मांडून त्याकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेत आहे. महाविकास आघाडीच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले असून त्या निराशेपायी हा नेता इकडे जाणार तो नेता तिकडे जाणार अशा निरर्थक चर्चा घडवून आणल्या जात आहेत. पवार साहेब हे अत्यंत अनुभवी व जुने नेते असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगले काम करत आहेत. तसेच यापुढेही अजित पवारांनी पवार साहेबांसोबत राहावे, ही राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांची इच्छा आहे आणि मला खात्री आहे. अजित पवार कोणासोबतही जाणार नाहीत.” असे म्हणत अहिर यांनी सध्या विरोधीपक्षनेते अजित पवारांबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले.

“आमचा अनुभव पाहता काहीही सांगता येत नाही…काही महिन्यांपूर्वी आमच्या मांडीला मांडी लावून बसणारे कसे फुटले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आमचा अनुभव पाहता राजकारणात कधी काय होईल याबाबत काहीही सांगता येत नाही.” असे सूचक वक्तव्य अहिर यांनी केले.

“महाविकास आघाडी मजबूत...महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये समन्वय असून आम्ही मजबुतीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठवत आहोत. 1 मे 2023 रोजी मुंबई येथे होणाऱ्या सभेची सर्वच घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून त्या सभेतही महाविकास आघाडीची ताकद दिसून येईल. तसेच विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 14 मे 2023 रोजी महाविकास आघाडीची पुणे येथे सभा होणार असून त्यावेळी 'दुध का दुध, पाणी का पाणी' हे सगळ्यांना दिसेल.” असे म्हणत अहिर यांनी अजित पवारांविषयी विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

“राजकीय हव्यासापोटी निष्पाप नागरिकांचा जीव गेला... आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी व राजकीय हव्यासापोटी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा भर उन्हात उघड्या मैदानात घेण्याण आला ज्यात अनेक निष्पापांचा उष्माघाताने जीव गेला. चार ते पाच मंत्री आठ ते दहा दिवस सर्व काम सोडून या सोहळ्याची तयारी करत होते मग त्यांना नागरिकांच्या सोयीचा विचार करता आला नाही का?” असे म्हणत झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी शासनाची असल्याचे अहिर यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                               

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                      

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes    

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.