या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ
गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सांबरेवाडी (Sambarewadi) येथील भवानी आई माता देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील तब्बल दहा सदस्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. हे सर्वजण सिंहगडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या खामगाव मावळ तालुका हवेली (Haveli, Maval, Khamgaon) येथे राहणारे असून यामध्ये सर्व सदस्यांची प्रकृती गंभीर आहे.
खामगाव मावळ येथील रेशमा भदिर्गे, मालन थोपटे, सुरेखा थोपटे, संस्कार भदिर्गे, कादंबरी भदिर्गे, राहुल पवार, नारायण भदिर्गे, सयाजी भदिर्गे, नंदा भदिर्गे व सुरेश चोरघे हे सर्व नातेवाईक काल दुपारच्या सुमारास देवदर्शनाला गेले असतांना त्यावेळी अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला.
मधमाशांच्या हल्ल्याची तीव्रता एवढी भयानक होती की सर्व सदस्य अत्यावस्थ होऊन पडले होते. गावातील काही नागरिकांना व कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती मिळाल्यानंतर अत्यावस्थ स्थितीत पडलेल्या सर्वांना शोधून काढण्यात आले व खाजगी वाहनाने सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा (Kirkatwadi Phata) येथील खाजगी रुग्णालयात सर्वांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांनी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांना तातडीने माहिती दिली असून गरज पडल्यास रुग्णांना उपचारांसाठी इतरत्र हलविण्याची व्यवस्था केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -
(Reshma Bhadirge, Malan Thopte, Surekha Thopte, Sanskar Bhadirge, Kadambari Bhadirge, Rahul Pawar, Narayan Bhadirge, Sayaji Bhadirge, Nanda Bhadirge and Suresh Chorghe)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84