Type Here to Get Search Results !

Sarja Movie: 'सर्जा'च्या ट्रेलरवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव; 1 दिवसात 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी युट्युबवर पाहिला ट्रेलर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

sarja marathi movie trailer released - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): अनोख्या टायटलसोबतच फर्स्ट लुकमुळे (First Look) लाइमलाईटमध्ये आलेल्या 'सर्जा' या आगामी मराठी चित्रपटातील (Sarja Marathi Movie) गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. यातील 'जीव तुझा झाला माझा...', 'धड धड...' आणि 'संगतीनं तुझ्या...' ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्यानं 'सर्जा'बाबतची उत्सुकता (Craze) वाढली आहे. आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज (Sarja Marathi Movie Trailer) करण्यात आला आहे. चित्रपटाची झलक दाखवणाऱ्या 'सर्जा'च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत असून, रिलीज झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात 'सर्जा'च्या ट्रेलरवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. (sarja trailer)

राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची (Rajvardhan Films Creation) प्रस्तुती असलेल्या 'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील (Amit Jaipal Patil) यांनी केली असून, रमेश रंगराव लाड (Ramesh Rangrao Lad) आणि अभयसिंह माणिकराव हांडे पाटील (Abhay Singh Manikrao Hande Patil) या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान 'सर्जा' चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे (Dhananjay Manohar Khandale) यांनी केलं आहे. सुमधूर पार्श्वसंगीत, श्रवणीय गीत-संगीत, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, सहजसुंदर अभिनय आणि सुरेख दिग्दर्शनाची झलक 'सर्जा'च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. नायक-नायिकेच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे.

'सर्जा' हि जरी एक रोमँटिक लव्हस्टोरी (A romantic love story) असली तरी यात समाजातील विविध घटक आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केल्याचं पहायला मिळणार आहे. प्रेमाचे विविध पैलू, प्रेमाचे बदलते रंग, प्रेमाच्या नाना छटा आणि कठीण प्रसंगांमध्येही खुलून येणारं खरं प्रेम हे 'सर्जा' चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार असल्याचे संकेत देणारा हा ट्रेलर आहे.

हेही वाचा - कोळीवाड्याच्या जग्गूची फॉरेनच्या चितळेसोबत धडाक्यात एन्ट्री; ‘जग्गू आणि जुलिएट’ चा कलरफुल ट्रेलर रिलीज

याबाबत दिग्दर्शक धनंजय खंडाळे म्हणाले की, आजवर बऱ्याच प्रेमकथा मोठ्या पडद्यावर आल्या असल्या तरी 'सर्जा'ची कथा खऱ्या अर्थानं अनोखी वाटावी अशी आहे. प्रेम ही एक अशी भावना आहे जी कोणत्याही बंधनात बांधता येऊ शकत नाही. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करण्याची शक्ती प्रेमात असते. 'सर्जा'मधील प्रेमकथा प्रेमाची नवी व्याख्या मांडणारी असून, संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनात वसणारी ठरेल अशी आशाही खंडाळे यांनी व्यक्त केली आहे.

दिग्दर्शनासोबतच धनंजय खंडाळे यांनी कथा, पटकथा, संवादलेखन व गीतलेखनही केलं आहे. मराठीतील आघाडीच्या कलाकारांसोबतच नवोदित कलाकारांची (new comer artists) निवड केली जाणं हे 'सर्जा'चं मुख्य वैशिष्ट्य असून, याद्वारे जुन्या आणि नव्या कलाकारांच्या अभिनयाचा सुरेख संगम घडवण्यात आला आहे. यात अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड, सानिया मुलानी या कलाकारांच्या भूमिका आहेत.

हर्षित अभिराज (Harshit Abhiraj) यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिलं आहे. नयनरम्य लोकेशन्सवरील नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी डिओपी राहुल मोतलिंग (Rahul Motling) यांनी केली असून, सुबोध नारकर (Subodh Narkar) यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन सुनील लोंढे (Sunil Londhe) यांनी केलं असून, प्रशांत प्रल्हाद शिंदे (Prashant Pralhad Shinde) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 14 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ३ मार्च रोजी प्रदर्शित होणार अ‍ॅक्शनपॅक्ड 'रौंदळ'

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.