Type Here to Get Search Results !

Shirgaon Murder Update: शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या खूनप्रकरणी सात जण ताब्यात

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

shirgaon murder update seven arrested - checkmate times

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय 47) (Shirgaon Sarpanch Praveen Sahebrao Gopale) यांचा शनिवारी (दि. 1 एप्रिल 2023) रात्री साई मंदिराच्या (Sai Mandir) प्रवेशद्वारावर निर्घृणपणे खून करण्यात (Shirgaon Murder Update) आला. त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (Viral CCTV Footage) झाले. त्यात दिसणाऱ्या तिघांना शिरगाव पोलिसांनी मंगळवारी (दि. 4 एप्रिल 2023) पहाटे अटक केली.

याबाबत सरपंच प्रवीण गोपाळे यांचे बंधू रवींद्र गोपाळे (Ravindra Gopale, brother of Sarpanch Praveen Gopale) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) फिर्याद दिली. फिर्यादी रवींद्र यांनी काही स्थानिक व्यक्तींवर संशय (Suspicion) व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक (Shirgaon Murder arrest) केली आहे.

विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25) (vishal alias Kiral Sunil Gaikwad), संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय 31) (Sandeep alias Anna Chagan Gopale), ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22, तिघे रा. शिरगाव, ता. मावळ) (Ritvik Shivaji Gopale), महेश पोपट भेगडे (वय 41, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे) (Mahesh Popat Bhedge), अशोक लक्ष्मण कांबळे ( वय 53, रा. कांब्रे नामा, ता. मावळ) (Ashok Lakshman Kambale), मनेश देवराम ओव्हाळ (वय 42, रा. जांभूळ, ता. मावळ) (Manesh Devram Oval), अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय 38, रा. डॅफोडील सोसायटी, सोमाटणे फाटा, ता. मावळ) (Amol Appasaheb Gopale) अशी आरोपींची नावे आहेत. अद्याप खुनाचे नेमके कारण समोर आले नाही. सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ (Senior Police Inspector Vanita Dhumal) यांनी माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रवीण हे त्यांच्या दुचाकीवर (एमएच 14/ एफझेड 7080) प्रति शिर्डी साई मंदिराच्या समोर रस्त्याच्या बाजूला बसले होते. त्यावेळी तिघांनी कट रचून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून (murder with koyta) केला.

त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 2 एप्रिल 2023) संशयित चार जणांना अटक केली. त्यांना गुरुवार (दि. 6 एप्रिल 2023) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 4 एप्रिल 2023) पहाटे शिरगाव पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मुख्य तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना सोमवार (दि. 10 एप्रिल 2023) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.

स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांचा खून केल्याचा संशय त्यांचे भाऊ फिर्यादी रवींद्र यांनी व्यक्त केला होता. मात्र अद्याप पोलीस तपासात नेमके कारण समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलीस (Shirgaon Murder Update) निरीक्षक वनिता धुमाळ तपास करीत आहेत.

हेही वाचा - Pune Crime: आज तुला कायमचे संपून टाकणार म्हणत एकावर धारदार शस्त्राने हल्ला; हडपसर मधील घटना

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.