Type Here to Get Search Results !

Rikshaw: कोथरूड मध्ये शिवकल्याण रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन; शरद मोहोळ यांचीही उपस्थिती

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): नेहमीच रिक्षाचालकांसाठी कौतुकास्पद काम करणाऱ्या समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे (Samarth Seva Rickshaw Foundation) संस्थापक आणि पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद उर्फ बंडू तांबे (Pune City Auto Rickshaw Federation President Anand alias Bandu Tambe) यांच्या संघटनेशी संलग्न शिवकल्याण रिक्षा स्टॅन्डचे (Shiv Kalyan Rickshaw Stand) कोथरूड येथील सुतारदरा (Sutardara) या भागात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी दहशतवादी कतील सिद्धीकीला यमसदनी पाठवणाऱ्या शरद मोहोळ (Sharad Mohol) यांचीही उपस्थिती होती.

यावेळी, भविष्यकाळात रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या, अडचणी, व्यावसायिक मागण्या असतील, त्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतील असे आश्वासन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap) यांनी दिले. तर माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor Deepak Mankar) यांनी आपल्या भाषणात, रिक्षाचालकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी पतसंस्थेची स्थापन करण्याचा सल्ला दिला. तर त्यातही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले. त्याचप्रमाणे चंदूशेठ कदम (Chandusheth kadam) यांनीसुद्धा रिक्षा चालकांच्या दैनंदिन जीवनातील व व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मदत करण्यास तयार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद उर्फ बंडू शेठ तांबे यांनी कोरोना कालावधीत रिक्षाचालकांना केलेल्या अन्नधान्य वाटपाची सविस्तर माहिती यावेळी सांगितली. त्याचप्रमाणे ओला, उबर, रॅपिडो यांच्या विरोधात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली. त्याचबरोबर रिक्षाचालकांनी भाडे नाकारू नये, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, प्रवासी हेच आपले दैवत असून त्यांच्या अडीअडचणीला सुद्धा धावून जावे आणि रिक्षा स्टॅन्ड हे नागरिकांच्यासाठी एक मदत केंद्र असावे, अशा भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा -

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष ढोक, मिलिंद वालवडकर, महेश हांडे, योगेश वराडे, नुकताच भाजप मध्ये प्रवेश घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती शरद मोहोळ आणि शरद मोहोळ, नयना सोनार, दत्ता भगत, कान्होजी साळुंखे, सुरेश तोंडे पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन रिक्षा स्टँडचे अध्यक्ष अमित कोंढाळकर, उपाध्यक्ष राजेंद्र मारणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते.

(NCP Santosh Dhok, Milind Walwadkar, Mahesh Hande, Yogesh Varade, recently joined BJP social activists Swati Sharad Mohol and Sharad Mohol, Naina Sonar, Dutta Bhagat, Kanhoji Salunkhe, Suresh Tonde Patil, Rickshaw Stand President Amit Kondhalkar, Vice President Rajendra Marne)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.