खालील लिंक वर क्लिक करा.
आता पुण्यातील रोजच्या घडामोडी वाचा
— Checkmate Times (@checkmate_times) April 11, 2023
एका मिनिटांत एका बटनावर!
पण कसे काय बरे?
एका क्लिकवर बातम्यांचा सारांश वाचा फक्त आमच्या ट्वीटर’वर
वेळ कमी, माहिती पुरी
पुण्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा.https://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या माध्यमातून बालभारती ते पौड रस्त्याचे (Balbharti to Paud Road) काम व सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदयांचे काम 320 कोटी रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. या कामांसाठी शहरातील वेताळ टेकडी (Vetal Tekdi) फोडण्यात येणार आहे.
ह्यामुळे पुण्याच्या पर्यावरणाची र्ह्यास होण्याची शक्यता आहे. ही टेकडी फोडल्यामुळे हजारो दुर्मिळ वृक्ष नष्ट होणार आहेत, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद होणार आहेत, उष्णता मोठया प्रमाणावर वाढणार आहे, तसेच भू-जल पातळीही मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या जगभर ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक संकटे जगावर येत आहेत, वेताळ टेकडी फोडून पुणेकरांना महानगरपालिका (PMC) वेगळ्याच संकटात ओढत आहे.
कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाची मागणी असली तरीही त्याची पूर्तता टेकडया फोडून, पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांना संकटात टाकून होऊ शकत नाही. याच कारणामुळे वेताळ टेकडी वाचविण्यासाठी (दि. 15 एप्रिल 2023) एप्रिल रोजी सायं 5 वाजता वेताळबाबा चौक ते जर्मन बेकरी (Vetalbaba Chowk to German Bakery) असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सुचनेनुसार, संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर (Liaison Chief MLA Sachin Ahir) यांच्या मार्गदर्शनाखाली, वेताळ टेकडी बचाव मोहिमेला शिवसेना' (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन देण्यात आले आहे. 15 एप्रिल 2023 च्या जनजागृती अभियानात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती सुतार यांनी पत्राद्वारे दिली.
या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे, यासाठी कृती समिती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar, Joint Communications Chief of Shiv Sena), शहरप्रमुख गजानन थरकुडे (City Chief Gajanan Tharkude), गटनेते पृथ्वीराज सुतार (Group leader Prithviraj Sutar) यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपशहरप्रमुख आनंद मंजाळकर (Deputy Mayor Anand Manjalkar), विभागप्रमुख प्रविण डोंगरे (Department Head Pravin Dongre) उपस्थित होते.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84