Type Here to Get Search Results !

Accident: सिंहगड रस्त्यावर डंपरने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू; वाहनचालक फरार

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ (Kirkitwadi Phata, Sinhagad Road) रामेश्वर पतसंस्थेच्या समोर भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित महिलेचा समोरुन येणाऱ्या टॅंकरखाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. (Pune Accidents)

हा पहा व्हिडीओ -

शिवाणी शैलेश पाटील (वय 24, रा. स्वप्नपूर्ती हाइट्स, किरकटवाडी, ता. हवेली) (Shivani Shailesh Patil) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शिवाणी पाटील आपल्या पतीसह दुचाकीवरून कामाला निघाल्या होत्या. सीसीटीव्ही कॅमेरऱ्यातील दृश्यांनुसार नांदेड फाट्याकडून एक दुचाकी जयप्रकाश नारायण नगरकडे वळण्यासाठी विरूद्ध बाजूने आल्याने डंपर चालकाने अचानक डंपार उजवीकडे घेतला. त्याच वेळी ओव्हरटेक करत असलेल्या दुचाकीला डंपरचा जोरात धक्का लागला व दुचाकीवरील व्यक्ती खाली पडल्या. समोरुन येत असलेल्या टॅंकरचे चाक महिलेच्या थेट डोक्यावरून गेल्याने महिलेचा यात जागीच मृत्यू झाला. (death after collision with dumper and tanker)

अपघातानंतर डंपर व टॅंकर ही दोन्हीही वाहने घेऊन संबंधित चालक पसार झाले आहेत. पोलिसांकडून दोन्हीही वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (Police Inspector Sachin Wangde of Haveli Police Station) यांनी दिली आहे.

डंपर आणि टॅंकरची रोजचीच घाई नागरिकांच्या जीवावर नांदोशी येथील दगड खाणींतून अवजड वाहतूक करणारे डंपर नियम डावलून भरधाव वेगाने किरकटवाडी व मुख्य सिंहगड रस्त्यावरुन ये-जा करत असतात. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत मात्र प्रशासन काहीही कारवाई करताना दिसत नाही.

हेही वाचा -

दुसऱ्या बाजूला सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. एकेक सोसायटी पाण्यासाठी दरमहा लाखो रुपये मोजत आहे आणि त्यामुळे टॅंकर चालकही रस्त्यावरील इतरांची पर्वा न करता भरधाव वेगाने 'टार्गेट' पूर्ण करण्यासाठी टॅंकर पळवत आहेत. डंपर आणि टॅंकरची ही रोजचीच स्पर्धा अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

"डंपर व टॅंकर या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. अपघाताचा व्हिडिओ मिळाला असून लवकरच दोन्ही वाहने व चालक सापडतील. दुर्दैवाने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे." असे हवेली पोलीस ठाण्याचे (पुणे ग्रामीण) पोलीस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.