Type Here to Get Search Results !

SNDT महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बनवलेल्या ‘शब्दलेणे’ विशेषांकाचे दीपा देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Publication of 'Shabdalene' special edition by SNDT college students - checkmate times

पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): एस. एन. डी. टी. महाविद्यालयाच्या (SNDT College) पदव्युत्तर मराठी विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी (PG second year girl students) ‘शब्दलेणे’ हा विशेषांक तयार केला. त्याचे प्रकाशन लेखिका आणि समाजसेविका दीपा देशमुख (Writer and social activist Deepa Deshmukh) यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व स्वागतगीताने झाली. अंकाच्या निर्मितीचा प्रवास विद्यार्थिनींच्या वतीने यामिनी पाठक यांनी मांडला. “या अंकातील साहित्य लिहिणे, मान्यवरांकडून साहित्य मागवणे, टंकलिखित करणे, मुद्रितशोधन करणे, जाहिराती मिळवणे अशा सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थिनींनी पार पाडल्या. विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असा उपक्रम झाला”, असे त्यांनी सांगितले. आंतरवासिता सेवाकालाच्या अंतर्गत कार्यानुभव म्हणून हा अंक तयार करण्यात आला.

दीपा देशमुख यांनी अंकातील साहित्याचा आढावा घेतला आणि या उपक्रमाचे कौतुक केले. स्वप्ना आपटे (Swapna Aapte), वैशाली कुलकर्णी (Vaishali Kulkarni), अक्षदा वाघ (Akshada Wagh), प्रज्ञा करंजावणे (Pradnya Karanjavane) यांनी गायन केले. प्रकाशन समारंभाप्रसंगी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या समन्वयक डॉ. शीतल मोरे (Post Graduate Department Coordinator Dr. Sheetal More) आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रताप गायकवाड (Head of Marathi Department Dr. Pratap Gaikwad) उपस्थित होते.

संगीता जोशी (Sangeeta Joshi) यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुप्रिया चित्राव (Supriya Chitrav) यांनी सूत्रसंचालन केले, सुचेता तिसगांवकर (Sucheta Tisgaonkar) यांनी आभार मानले.

हेही वाचा - श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठात 'रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस प्रतिमानांचे संशोधनातील उपयोजन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.