Type Here to Get Search Results !

Health Day | वारजे माळवाडीचा उकिरडा होतोय; विद्यार्थ्यांनी घेतला स्वच्छतेचा ध्यास, देवाला घेतले आधारास

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

students clean warje malwadi area - checkmate times

पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): कचरा पेटी मुक्त परिसर (garbage box free area) करण्याच्या नादात पुणे महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन (PMC Solid Waste Management) विभागाने कचरा पेट्या काढून टाकल्या खऱ्या, मात्र त्यानंतर आता कचऱ्याचे व्यवस्थापन (Waste management) लावण्यात आरोग्य विभाग (PMC Department of Health) सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यातच नगरसेवकांचा (corporator) कार्यकाळ संपल्यानंतर आलेल्या प्रशासक (pmc administrator) राजवटीत तर त्यात अधिकाऱ्यांची मुजोरी वाढलेली दिसत असून, ज्या ठिकाणी अगोदर कचरा पडत नसे, आता तिथे देखील उकिरडे (Garbage Depot) तयार झालेले पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया

असाच प्रकार वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील अरविंद स्मृती (Arvind Smriti) इमारतीसमोर झाला. गेल्या काही दिवसांमध्ये तेथे विजेच्या डीपीचा आधार घेत नवीन उकिरडा तयार झाला. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांच्या आरोग्याचा (Public Health Issue) प्रश्न निर्माण होत होता. ही समस्या ओळखून इमारतीत राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: येथील कचरा साफ करून, परिसर स्वच्छ (Area Cleaning) करत, डीपी वर देवाचे फोटो (Gods Photos) लावून उकिरडा बंद करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत 'चेकमेट टाईम्स’शी बोलताना (Speaking with Checkmate Times) त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आमच्या शाळेत आम्हाला स्वच्छतेचे महत्व (Importance of cleanliness) शिकवले गेले आहे. आम्ही शाळा आणि घरी देखील ते तंतोतंत पाळतो. कचरा फक्त कचऱ्याच्या डब्यात टाकण्यापासून, ओल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण (garbage segregation) देखील करतो. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहून आरोग्य सुदृढ राहते हे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र तरीही काही लोकं अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे आम्ही ही स्वच्छता केली असून, येथे प्राणवायूचा मुबलक पुरवठा करणारी तुळशीची देखील झाडे लावणार आहोत.

स्वाती अनिल पाटणकर या आयटी इंजिनिअर मुलीसह केतन गोविंद उगले, केतकी गोविंद उगले, तेजस तानाजी मालुसरे, ओंकार पवार, राजवीर पवार या शालेय विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता केली. तर भविष्यात येथे कोणी कचरा टाकू नये असे आवाहन त्यांनी केले असून, इतरही विद्यार्थ्यांनी आपापल्या भागात असे स्वच्छता अभियान राबवून सुट्ट्यांचा सदुपयोग करावा असेही आवाहन केले आहे. एकूणच वारजे माळवाडी मध्ये कचरा स्वच्छतेच्या बाबतीत पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे विद्यार्थ्यांच्या या आवाहनावरून समोर येते आहे.

हेही वाचा - Pune News: हर्णे बंदर येथील सुवर्णदुर्गावर असलेल्या या तोफांचे तरुणांनी केले काय?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.