खालील लिंक वर क्लिक करा
आता पुण्यातील रोजच्या घडामोडी वाचा
— Checkmate Times (@checkmate_times) April 11, 2023
एका मिनिटांत एका बटनावर!
पण कसे काय बरे?
एका क्लिकवर बातम्यांचा सारांश वाचा फक्त आमच्या ट्वीटर’वर
वेळ कमी, माहिती पुरी
पुण्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा.https://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): “मराठी ही ज्ञानभाषाच आहे. आपण केवळ मातृभाषेतून उत्स्फूर्तपणे बोलू शकतो. त्यामुळेच मातृभाषा टिकवून धरणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. मातृभाषा हेच शिक्षणाचं नैसर्गिक साधन आहे. अन्य भाषा या केवळ नोकरी, व्यवसायासाठी शिकल्या जातात. तुम्ही भाषा शिकता तेव्हा जीवनाची मुलभूत तत्वे शिकत असता. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जी वस्तू वापरली जात नाही, ती मृत पावत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भाषेवर नुसते प्रेम करू नका तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तिचा वापर करा,” असे आवाहन जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ (Senior reviewer Dr. Sudhir Rasal) यांनी केले.
साहित्यदीप प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्यदीप जीवनगौरव पुरस्कार (Sahityadeep Lifetime Achievement Award) देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्यपरिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (Laxmikant Deshmukh) होते. तर राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित (Raja Dixit, President, Marathi Encyclopaedia Board) प्रमुख पाहुणे होते.
यावेळी पुढे बोलताना रसाळ म्हणाले की,"कवी आणि समीक्षक यांचे नाते अही नकुल यांच्यासारखे आहे. मी अनेक कवींवर टिका केली. त्यात कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांचाही समावेश होता. परंतु त्यांच्या कवितेवर टीका करूनही आमच्या मैत्रीत अंतर पडले नाही. मी समीक्षक या नात्याने कवींवर अनेकदा टीका केली असं असतानाही आज साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्यवाह कवी धनंजय तडवळकर हे दोघे कवी असूनही यांनी माझा सत्कार करावा ही अत्यंत आनंददायी बाब आहे.”
तर राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी म्हटले की,”जेव्हा मराठवाड्यात उर्दुचे प्राबल्य होतं. मराठीची गळचेपी होत होती. त्या परिस्थिती मराठी टिकवून धरणं, मराठी भाषेची सेवा करणं हे आव्हान होतं. आणि ते आव्हान सुधीर रसाळ, नरहर कुरुंदकर, नरेंद्र चपळगावकर यांनी उत्तम रीतीने पेललं. काव्याची संस्कृतीनिष्ठ समीक्षा हे सुधीर रसाळ यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. मराठवाड्यात मराठीविषयी जागृती होत होती. साहित्य फुलून येत होतं. समीक्षा पुढे येत होती त्या टप्प्याचे सुधीर रसाळ हे मुख्य प्रतिनिधि आहेत.”
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,”सुधीर रसाळ यांच्या समिक्षेने कवितेकडे, साहित्याकडे बघण्याची दृष्टी दिली. कवितेचा आस्वाद कसा घ्यावा हे शिकवलं. साहित्याने मानवी जीवनाला कोणती जीवन दृष्टी दिली सांगणाऱ्या मोजक्या समीक्षकांमध्ये रसाळ सरांचा क्रमांक फार वरचा आहे. मराठी टिकवून धरायची असेल तर सगळा जीवन व्यवहार मराठीत व्हायला हवा. आज समाजजीवनाची भाषा हिंदी, इंग्रजीकडे झुकते आहे. ज्ञान, अर्थ आणि शासन ठिकाणी मातृभाषेचा प्रभावी वापर होत असेल तर भाषेचा विकास होणे सहजसाध्य होते. त्या दिशेने सार्वत्रिक आणि सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत.”
यावेळी मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, वास्तू देखभाल प्रमुख प्रमोद आडकर, कार्यवाह उद्धव कानडे, वि. दा. पिंगळे, शिरीष चिटणीस आणि वास्तुरचनाकार माधव हुंडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर विश्वास वसेकर, चिन्मयी चिटणीस, नूतन शेटे, भारती पांडे, मनोहर सोनवणे, वि दा पिंगळे यांच्या कवितांचे सादरीकरण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव कानडे यांनी केले. तर धनंजय तडवळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आरती रसाळ, भारत सासणे, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, विजय शेंडगे, सदानंद बोरसे, वैशाली मोहिते, चंचल काळे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes