Type Here to Get Search Results !

Vetal Tekdi: टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

supriya sule inspected vetal tekdi - checkmate times

पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी (Vetal Tekdi) फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी काल दिले. 

सुळे यांनी आज वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या (Vetal Hill Rescue Action Committee) सदस्यांसोबत टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शहराचा विकास झालाच पाहिजे. आपण स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (Nationalist Congress Party) विकासाच्या बाजूनेच आहोत, तथापि विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यासाठी स्थानिक नागरिकांशी चर्चा करायलाच हवी. त्यासाठी आपण विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

कोथरूड हून पुणे विद्यापीठ (Pune University) तसेच पाषाण-बाणेर-औंध या भागात जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने नव्या रस्त्याचे नियोजन केले आहे. यात बालभारती ते पौड फाटा रस्ता तसेच कोथरुड (Kothrud), पाषाण (Pashan) आणि सेनापती बापट रस्ता (Senapati Bapat Road) या दोन रस्त्यांना जोड देण्यात येणार आहे. यासाठी वेताळ टेकडी फोडून दोन बोगदे आणि एक पूल उभारण्यात येणार आहे. तथापि याला शहरातील पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असून गेल्या आठवड्यापासून हा विषय शहरात चांगलाच गाजत आहे. यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीही स्थापन झाली असून या समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. 16 एप्रिल 2023) खासदार सुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते.

त्यानुसार काल दुपारी खासदार सुळे यांनी समितीच्या सदस्यांसोबत वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या भावना समजून घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. टेकडी फोडून प्रस्तावित रस्ता आणि बोगदे रद्द करावेत तसेच वेताळ टेकडीला 'नैसर्गिक वारसास्थळ', 'ना विकास क्षेत्र' म्हणून जाहीर करावे, अशी समितीची मागणी आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी असे त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सुमिता काळे (Sumita Kale), प्राजक्ता दिवेकर (Prajakta Divekar), हर्षद अभ्यंकर (Harshad Abhyankar), सुषमा दाते (Sushma Date), प्रदीप घुमरे (Pradeep Ghumare), अवंती गाडगीळ (Avanti Gadgil), गौरी मेहेंदळे (Gauri Mehendale), अंगद पटवर्धन (Angad Patvardhan) यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                               

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                      

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes    

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.