Type Here to Get Search Results !

Kothrud | धुव्वादार पावसात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थनार्थ कोथरूड मध्ये गौरव यात्रा

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

svatantryaveer savarkar gaurav yatra - checkmate times

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Svatantryaveer Sawarkar) हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली तर ते कोणालाही समजू शकणार नाहीत. तसेच त्यांची सामाजिक भूमिकाही खूप मोठी होती. त्यांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं हा ढोंगीपणा असल्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher Education Minister Chandrakant Patil) म्हणाले.

सावरकर प्रेमींनी महर्षी कर्वे पुतळा (Maharshi Karve Putala) ते स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल (Svatantryaveer Sawarkar) या दरम्यान पायी गौरव यात्रा काढली. परंतु गौरव यात्रेला सुरूवात होताच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. तरीही यात्रा सुरूच होती. त्यांनी 'स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानात महाराष्ट्र मैदानात', 'देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर' या आशयाचे फलक हातात घेतले होते, तसेच डोक्यावरही 'मी सावरकर' असे लिहिलेली टोपी परिधान केली होती. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले,”किती वेळा सावरकरांचा अपमान करणार? या विरोधात देशभरात तीव्र असंतोष आहे. या गौरव यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या मनात त्याबद्दल चीड असून ते निषेध नोंदवीत आहेत. भारतरत्नाचा योग्य वेळी निर्णय सावरकरांना भारतरत्न दिला जाईल, प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते, त्यांच्यासह आणखी काही जणांना पुरस्कार द्यायचा आहे. पुरस्काराबाबत योग्य वेळेला निर्णय घेण्यात येईल. त्याबाबत तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नसल्याचे पाटील म्हणाले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या,”देशप्रेमींचा अपमान ही कॉंग्रेसची निती आहे, सावकरांचा अपमान हिंदुस्थान कदापि सहन करणार नाही.”

चंद्रकांत पाटील म्हणाले,”राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही आणि ते स्वातंत्र्यवीरांचा अपमान, हीन वक्तव्य करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून उत्तर देण्याची गरज होती. यांना शक्तीचीच भाषा समजते, राष्ट्रवादीसह उध्दवजींचीही भाषा बदलली आणि आता सगळे गुणगान गायला लागले आहेत. तुमचे सावरकरांबद्दलचे प्रेम हे राजकीय आहे का? असा सवालही उपस्थित केला.”

सुनील मारणे यांची अनुपस्थिती

कोथरूड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी म्हणून उद्योजक आणि भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष सुनील मारणे यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. त्यांच्या कार्यालयासमोर बाराही महिने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फ्लेक्स झळकत असतो. खडकवासला विधानसभा मतदार संघातून मागील विधानसभेची निवडणूक लढण्यास ते इच्छुक होते. तशी त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. मात्र ही यात्रा कोथरूड मध्ये निघाली असताना, त्यांची या यात्रेत अनुपस्थिती जाणवली.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule: राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड; चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.