Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 3 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): 'मोबाईलचे हप्ते का भरत नाहीस?' असे विचारल्याने तिघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून तिघांनी (Stabbing With koyta and created terror) सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 28 मार्च 2023) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील यशवंतनगर (Yashwant nagar) येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.
या प्रकरणी विशाल नंदकिशोर खंदारे (Vishal Nandkishor Khandare) (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. मयूर अंकुश मते (Mayur Ankush Mate) (वय 21), स्वप्नील उर्फ मोन्या आनंद जाधव (Swapnil alias Monya Anand Jadhav), गणेश ऊर्फ सौरभ आनंद जाधव (Ganesh alias Saurabh Anand Jadhav) (वय 22) यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. यातील मयूर मते आणि गणेश जाधव याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर मते याने फिर्यादी खंदारे यांच्या नावावर हप्त्याने मोबाईल घेतला. मात्र मयूर याने मोबाईलचे हप्ते भरले नाहीत. ‘तू हप्ते का भरले नाहीस’ असे फिर्यादी याने मयूर याला विचारले. या गोष्टीचा मयूर याला राग आला. तो राग मनात ठेवून मयूर याने आपल्या दोन साथीदारांसह फिर्यादीला शिवीगाळ केली.
हेही वाचा - Pune Crime: आज तुला कायमचे संपून टाकणार म्हणत एकावर धारदार शस्त्राने हल्ला; हडपसर मधील घटना
‘मी हप्ते भरणार नाही, तुला काय करायचे ते कर.’ अशी धमकी दिली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फिर्यादी जखमी होऊन खाली पडले असताना देखील कोयत्याच्या मागच्या बाजूने त्यांच्यावर पुन्हा वार केले. त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याकारणाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने नागरिकांत काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Police) करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84