Type Here to Get Search Results !

TDM Trailer: 'जिंदगी झंड झाली की, मुंबई पुण्याची आठवण येते' म्हणत 'टीडीएम'चा ट्रेलर होतोय व्हायरल

 खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 15 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर (TDM Trailer) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. प्रेक्षकही या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत होते. अशातच टीडीएमच्या ट्रेलरने हवा केली आहे. ऍक्शन रोमान्सचा भरणा असलेला हा चित्रपट गावाकडच्या मातीतला असून प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करतोय. ट्रेलर पाहताच क्षणी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला 'ख्वाडा', 'बबन' यांच्या यशस्वी निर्मितीनंतर दिग्दर्शक भाऊराव कराडे (Director Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' हा चित्रपट 28 एप्रिल (TDM Marathi Movie) 2023 ला सज्ज झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून नवख्या कलाकारांचा भास जराही जाणवत नाहीये. खेड्यापाड्यातील नायकाचा हजरजबाबीपणा, त्याची चालण्या बोलण्याची पद्धत हे सर्व पाहणं रंजक ठरतंय. ट्रेलरमध्ये नायक आणि नायिकेच्या रोमॅंटिक अंदाजाची झलक पाहणं भावतंय. या ट्रेलरमधील डायलॉगने तर सगळीकडे कल्लाच केलाय. ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं तसं यात भाऊरावांची दमदार एन्ट्री पाहायला मिळतेय. यांत ट्रेलरमधील 'लाथ मारशील तिकडे पाणी काढशील' या त्याच्या डायलॉगने साऱ्यांच्या मनावर राज्य केलंय. भाऊरावांच्या या कलाकृतीलाही प्रेक्षक, चाहते नक्कीच प्रतिसाद देतील हे ट्रेलर गाण्यांवरून कळतंय, यांत वादच नाही.

हेही वाचा -

'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. या चित्रपटाच्या संवाद, पटकथा आणि कथेची जबाबदारी भिकू देवकाते (Bhiku Devkate), भाऊराव कऱ्हाडे, प्रो. किरण गाढवे (Prof. Kiran Gadhve) यांनी सांभाळली आहे. तर संगीताची बाजू रोहित नागभिडे (Rohit Nagbhide), ओंकारस्वरूप बागडे (Omkarswaroop Bagade), वैभव शिरोळे (Vaibhav Shirole) यांनी पेलवली आहे. तर गायक नंदेश उमप, ओंकारस्वरूप, वैभव शिरोळे, प्रियंका बर्वे (Priyanka Barve), आनंदी जोशी (Aanandi Joshi) गाणी आपल्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाण्यांना चारचाँद लावलेत. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील (Virdhawal Patil) यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होण्यास सज्ज होत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.