Type Here to Get Search Results !

Sasoon Hospital: थायरॉईड मिशन; थायरॉईडचे निदान आणि उपचारासाठी ससून मध्ये स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

OPD started in sasoon hospital for thyroid mission - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी (B. J. Medical College) संलग्न ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sasoon Hospital) थायरॉईड (Thyroid) आजाराचे निदान आणि उपचारासाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (Outpatient Department - OPD) सुरू करण्यात आला आहे. ‘थायरॉईड मिशन’च्या (Thyroid Mission) अंतर्गत सुरू केलेल्या या ‘ओपीडी’चे उद्‍घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर (Dr. Sanjay Thakur) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

थायरॉईड रुग्णांना ससून रुग्णालयात एकाच छत्राखाली सर्व उपचार मिळणार आहेत. या आजाराचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही ‘ओपीडी‘ रुग्णांना उपयुक्त ठरेल. मिशन थायरॉईडअंतर्गत दर गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत थायरॉईड रुग्णांचे निदान व उपचार होतील.

या निमित्ताने पोस्टर आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. डॉ. बोरसे यांनी थायरॉईडच्या विविध आजारांचे निदान आणि उपचार याची माहिती दिली. प्रा. डॉ. एच. बी. प्रसाद यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

या वेळी पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे (Post graduate Dr. Muralidhar Copper), पदवीपूर्व अधिष्ठाता डॉ. आरती किणीकर (Undergraduate Dr. Aarti Kinikar), वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय जाधव (Medical Superintendent Dr. Vijay Jadhav), उपअधिक्षक डॉ. यल्लपा जाधव (Deputy Superintendent Dr. Yallapa Jadhav) उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. आर. टी. बोरसे (Head of Medicine Department Dr. R. T. Bourse) यांनी केले.

हेही वाचा - पुण्याची आरोग्य सेवा कोलमडली; गोरगरीब रुग्णांचे हाल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.