कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 22, 2023
पाहिला जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #WorldBookDay #bookday #WorldBookDay2023
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 24 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे पानशेत, सिंहगड, खडकवासला परिसरात (panshet, Sinhagad, Khadakwasla) पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सिंहगड रोडवरील खडकवासला धरण चौपाटी, धरण चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. या भागात रविवार (दि. 23 एप्रिल 2023) सकाळ पासूनच वाहतूक कोंडी (Traffic at Khadakwasla) झाल्याचे चित्र दिसून आले.
खडकवासला धरण चौकात दुपारपासून कोंडी वाढल्याने वाहतूक ठप्प झाली. खडकवासला ते डीआयएटी (Khadakwasla to DIAT), खडकवासला ते कोल्हेवाडी (Khadakwasla to Kolhewadi) व धरणाखालील खडकवासला-एनडीए रोड (NDA Road) या तिन्ही बाजूंच्या रस्त्यांवर दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. मात्र, वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. अखेर काही स्थानिक युवक मदतीला धावून आल्यानंतर कोंडी कमी झाली.
सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी सुरूच होती. सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Road) गेल्या रविवारच्या तुलनेत पर्यटकांची संख्या रोडावली होती. दिवसभरात गडावर 373 चारचाकी व 583 दुचाकी आल्याची नोंद झाली आहे.
हेही वाचा -
कडक उन्हामुळे पर्यटक पानशेत, वरसगाव धरण (Varasgaon) परिसरात धाव घेत असल्याचे चित्र दिसून आले. खडकवासला धरण चौपाटीवर मौजमजा करण्यासाठी आलेले पर्यटक रस्त्यावरच वाहने उभी करून गायब झाले होते. तर खाद्यपदार्थ विक्रेतेही वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करत व्यावसायात मग्न होते. चौपाटी हाऊसफुल्ल होऊन बस, जीप अशी वाहने अडकून पडत होती. याठिकाणी अगोदरच रस्ता अरुंद आहे. असे असताना पर्यटकांच्या दोन्ही बाजूला उभ्या केलेल्या वाहनांचा फटका (Traffic at Khadakwasla) वाहतुकीला बसला.
याबाबत “वाहतूक कोंडी होणार्या खानापूर, डोणजे चौक, धरण चौपाटी, किरकटवाडी फाटा या ठिकाणी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. गर्दीच्या दिवशी रस्त्यावर वाहने, हातगाड्यांना प्रतिबंधक करावे” अशी मागणी भाजपचे सुनील हगवणे (Sunil Hagavane, BJP) व दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पारगे (Bajirao Parge, President of Divyang Vikas Sanstha) यांनी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes