कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 21, 2023
पृथ्वी दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #EarthDay2023 #EarthDay
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यात 2021-22 या वर्षाच्या तुलनेत या गेल्या वर्षी (2022-23) देशी मद्याच्या विक्रीत (Liquor Sale) तब्बल 15 टक्के, विदेशी मद्यविक्रीत 23 टक्के आणि बिअर विक्रीत 51 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय वाइन विक्रीमध्ये 31 टक्के इतकी वाढ झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला (State Excise Department) सरत्या आर्थिक वर्षात मिळालेल्या महसूलावरून ही माहिती मिळाली असून गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 2224.82 कोटी रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाला.
अवैधरित्या गोवा राज्यातून उत्पादन शुल्क बुडवून महाराष्ट्रात वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात 21 गुन्हे दाखल करून 42 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 19 वाहने जप्त करून 8 कोटी 64 लाख 45 हजार 169 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या ढाब्यांवर मद्य सेवन केल्याप्रकरणी 134 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून न्यायालयाकडून 290 आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडापोटी 3 लाख 96 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत (Superintendent of State Excise Pune Division C. B. Rajput) यांनी दिली.
महसूल (आकडेवारी: राज्य उत्पादन शुल्क विभाग)(रुपयांत)
• 1955.82 कोटी – 2021-22
• 2224.82 कोटी – 2022-23
हेही वाचा -
तसेच उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या 2022-23 या वर्षातील आकडेवारीनुसार 2658 गुन्हे दाखल आहेत तर 2947 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून जप्त केलेल्या मुद्देमालाची संख्या 18 कोटी 14 लाख 19 हजार 177 रुपये इतकी आहे.
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री यांबाबत यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार आहे. शहरासह जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 आणि दूरध्वनी क्रमांक 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही राजपूत यांनी केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes