कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 25, 2023
जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणाऱ्या अधिवेशनाची अंमलबजावणी कधी झाली?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #intellectualproperty @WIPO
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): रांजणगांव (Ranjangaon) येथील औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (Electronic Manufacturing Cluster - EMC) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी गुरुवारी (दि. 20 एप्रिल 2023) केले.
रांजणगांव औद्योगिक वसाहत येथील रिया हाऊस (Riya House, Rajangaon) येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि चाकण (Chakan) व तळेगाव (Talegaon) औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणे क्षेत्राचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता आर. एस. गावडे, कार्यकारी अभियंता दिलीप जोगवे, मारुती कालकुटकी, संजय कोतवाड, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर आणि स्थानिक उद्योग समूहातील प्रतिनिधी उपस्थित होते.
सामंत म्हणाले,”रांजणगांव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने 347 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर 650 कोटी रुपयांचा निधी पाईप लाईनसाठी मंजूर केला आहे. प्लग आणि प्लेचे 60 युनिट सुरू करण्यात येत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास 50 एकर जागेत हे क्षेत्र वाढवण्याचा मानस आहे.”
पुढे ते म्हणाले,”उद्योग संघटनेने मागणी केलेल्या कौशल्य केंद्रासाठी व कामगार रुग्णालयासाठी प्रत्येकी 5 एकर जागा तसेच पोलीस विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्याचे मंजूर केले आहे. पथदिव्यांसाठी 14 कोटी, अंतर्गत रस्त्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यात या ठिकाणी हेलिपॅड, कामगारांच्या निवासाची सोय करण्यात येईल.”
हेही वाचा -
“उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी शासनाचे सर्वोपोतरी सहकार्य राहील. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत यासाठी शासन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सोई सुविधा, सवलती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथील उद्योगांनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगांची वाढ होत असताना परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा वाढत असतात. त्याप्रमाणेच तेथील तरुणांनाही रोजगार मिळाल्यास अशा उद्योगांच्या मागे तेथील स्थानिक युवक उभे राहतील असे सांगून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प वेळेत पूर्ण करावा.” अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या. यावेळी मुख्य अभियंता वानखेडे (Chief Engineer Wankhede) यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
(Former Member of Parliament Shivajirao Adharao Patil, Chief Engineer of Maharashtra Industrial Development Corporation Pune Region Nitin Wankhede, Superintending Engineer R. S. Gawde, Executive Engineer Dilip Jogve, Maruti Kalkutki, Sanjay Kotwad, Regional Officer Sachin Barwakar)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84