Type Here to Get Search Results !

Unauthorised Construction: सिंहगड रोडला दोन अनधिकृत इमारती जमीनदोस्त; महापालिका प्रशासनाची कारवाई

भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk, Sinhagad Road) येथील सिंहगड कॉलेजजवळ (Sinhagad College) अनधिकृत बांधकाम केलेल्या दोन इमारतींवर नुकतीच कारवाई करण्यात आली. यात पाच मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक 2 च्या (Construction Department, PMC) वतीने ही कारवाई करण्यात आली. दोन हजार चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इमारतींच्या मालकांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली होती. कारवाईस नागरिकांनी विरोध केला. परंतु, तो न जुमानता अधिकार्‍यांनी तणावग्रस्त परिस्थितीत कारवाई सुरू केली. या वेळी अधिकारी व नागरिकांत बाचाबाची झाली. दरम्यान, अधिकार्‍यांनी काही वेळ कारवाई थांबवून स्थानिक पोलिसांची मदत मागविली.

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने (Assistant Police Inspector Deepak Kadbane of Sinhagad Road Police Station) यांनी कर्मचार्‍यांच्या मदतीने जमावास पांगवून तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. जॉकटर, एक जेसीबी, गॅसकटर आणि 20 कर्मचार्‍यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

बांधकाम अधीक्षक युवराज देशमुख यांच्या नियंत्रणाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे, उपअभियंता विजय कुमावत, प्रवीण भावसार, कनिष्ठ अभियंता उदय पाटील, महेश झोमन, हेमंत कोळेकर, रितेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा -

(Construction Superintendent Yuvraj Deshmukh, Executive Engineer Hemant More, Deputy Engineer Vijay Kumawat, Praveen Bhavsar, Junior Engineer Uday Patil, Mahesh Zoman, Hemant Kolekar, Ritesh Shinde)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.