Type Here to Get Search Results !

Pune Market Yard: ये ग ये ग सरी, शेत माझे बहरी; सर आली धावून, नेल्या भाज्या वाहून

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

vegetables damaged by unseasonal rain - checkmate times

पुणे, दि. 15 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यात अवेळी झालेल्या वादळी पावसामुळे (Unseasonal rain) भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागांचे मोठे नुकसान (vegetable damage) झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचा स्थायी आदेश असल्याने लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील, असे शुक्रवारी (दि. 14 एप्रिल 2023) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात पावसापेक्षा जोराच्या वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा आंबा, द्राक्षे, अंजीर, चिक्कू, जांभूळ या फळबागा, तर भाजीपाला पिकांमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका चवळी आदी पालेभाज्या, हिरवी मिरची, वांगे, कारले, दोडका, कांदा, टोमॅटो आदी फळभाज्यांना फटका बसला आहे. काही ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. वीज कोसळल्यामुळे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील (Nimgaon ketaki, Indapur) पाटील वस्तीवरील दुभती गाय मृत्यूमुखी पडली आहे. ऊस भुईसपाट झाला आहे.

एप्रिल हा उन्हाळी महिना समजला जातो. या महिन्यात गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची नुकतीच काढणी झालेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ही पिके निघताच, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतीच्या पूर्वमशागतीची कामे सुरु केली जातात. त्यानुसार शेतकऱ्यांनी ही पूर्वमशागतीची कामे सुरु केली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून सुरु झालेल्या वादळी पावसामुळे ही कामे थांबवावी लागली आहेत.

या वृत्ताला कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. परंतु पंचनामे पूर्ण होऊन पिकांच्या नुकसानीचे अंतिम आकडेवारी उपलब्ध होईपर्यंत याबाबत अधिकृत सांगता येणार नसल्याचे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा -

राज्यातील केसरी आंब्याचा मोसम संपत आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील केशर आंबा बाजारात येत असतो. हा केशर आंबा दरवर्षी साधारणतः जून महिन्यात बाजारात येत असतो. त्यामुळे या आंब्याला जुन्नर आणि जून महिन्याच्या नावावरून जुन्नरी केशर आंबा (Junnari Keshar Mango) म्हणून ओळखले जाते.

हा जुन्नर केशर आंब्याला नुकताच दुसरा बहार आलेला आहे. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळाने हा दुसरा बहारही गळून पडला आहे. त्यामुळे यंदा जुन्नरी केशर आंब्याची आवक घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.