Type Here to Get Search Results !

Varandha Ghat: भोरमार्गे वरंधा घाट होणार सोप्पा; रायगड जिल्ह्यात जाणारा हा भाग आता राष्ट्रीय महामार्गाकडे

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

varandha ghat road development contract to nhai - checkmate times

पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भोरमार्गे वरंधा घाटातून (Varandha Ghat) रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad), राजेवाडीपर्यंत (Rajewadi) जाण्यासाठी यापुढे जीव मुठीत घेऊन जावे लागणार नाही. हा मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (National Highways Authority of India-NHAI) ट्रान्सफर करण्यात आला असून, वरंधा घाटातील धोकादायक वळणे कमी करण्यात येणार आहेत. घाटातील दरडी कोसळण्यापासून संरक्षणासाठी भिंतही बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वरंधा घाटातील प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे.

पुण्यातून कोकणाकडे (Kokan) भोरमार्गे (Bhor) वरंधा घाट, रायगड जिल्ह्यातील (Raigad) महाड, राजेवाडीपर्यंत जाण्यासाठी आतापर्यंत कित्येक तास प्रवास करावा लागत होता. प्रवासाचे अंतर वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. वरंधा घाटातील रस्ता धोकादायक वाटत असल्याने अनेकदा घाट बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळे पुण्यातून महाड किंवा कोकणात रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी ताम्हिणी घाटामार्गे (Tamhini Ghat) प्रवास करावा लागत होता.

परंतु आता शिरवळजवळील (Shirwal) शिंदेवाडी ते भोरमार्गे वरंधा घाटापर्यंत 70 किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्याची निविदा काढण्यात आली आहे. वरंधा ते राजेवाडी या मार्गाचे काम सुरू आहे. शिंदेवाडी ते वरंधा घाट आणि पुढे राजेवाडीपर्यंत सुमारे 92 किलोमीटर अंतरापर्यंतच्या रस्त्याचे सुमारे 850 कोटी रुपयांच्या खर्चाचे काम आहे. आतापर्यंत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत होता. आता हा रस्ता ‘एनएचएआय’कडे (NHAI) ट्रान्सफर केला आहे.

शिंदेवाडी ते भोरच्या पुढे वरंधा घाटाच्या सुरुवातीपर्यंतच्या सुमारे 750 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. त्या निविदा मान्य होऊन लवकरच काम सुरू होणे अपेक्षित आहे. या सुमारे 50 ते 60 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तीन पदरी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पुढे घाट संपल्यानंतर कोकणातील मार्गांचेही तीन पदरी काँक्रिटीकरण केले जाईल, असे भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वरंधा घाटात दर वर्षी सुमारे 40 ते 50 दरडी कोसळतात. त्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी पूर्वी काही उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या. आता दरडींपासून संरक्षणासाठी संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दरड कोसळण्याच्या धोक्यापासून वाचणे शक्य होणार आहे.

वरंधा ते राजेवाडी-रायगड हे अंतर सुमारे 22 किलोमीटर आहे. यात प्रत्यक्ष वरंधा घाटातील अंतर नऊ किलोमीटर असून, त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तो रस्ता दोन पदरी असेल. पुढे कोकणातील उर्वरित 13.5 किलोमीटर लांबीचा रस्ता तीन पदरी केला जाणार आहे. घाटाच्या भागात वनजमीन असल्याने नव्याने आराखडा तयार करता येत नाही. परिणामी, वरंधा घाटातील धोकादायक वळणे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याबाबत भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार (National Highway Authority of India Chief Engineer Santosh Shelar) म्हणाले कि,“शिंदेवाडी ते राजेवाडी हा मार्ग आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. हा मार्ग ‘एनएचएआय’कडे वर्ग करण्यात आला आहे. प्रवाशांना हा मार्ग सुकर व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेगाने जाणे शक्य होईल. रस्ता चांगला होऊन घाटातील धोकादायक वळणे कमी होतील.”

हेही वाचा - वरंधा घाट टोल रस्त्यासाठी ७२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; नितीन गडकरी यांचे ट्वीट

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.