Type Here to Get Search Results !

Pune Crime: मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या रुग्णालयाच्या वॉर्ड बॉय विरोधात गुन्हा दाखल

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

wardboy stole deadbody's gold chain - checkmate times

पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भोवळ येऊन रस्त्यात पडलेल्या पादचाऱ्याला वानवडीतील नामवंत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. परंतु मृत रुग्णाच्या गळ्यातील 70 हजारांची सोनसाखळी चोरून (goldchain stolen from deadbody) नेल्याप्रकरणी रुग्णालयातील वॉर्डबॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत दीपक चंदू परदेशी (वय 60, रा. वैदुवाडी, हडपसर) (Deepak Chandu Pardeshi) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली. मारुती किसन भालेराव (वय 36, रा. आझादनगर, वानवडी) (Maruti Kisan Bhalerao) असे या वॉर्डबॉयचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक यांचे भाऊ आकाश परदेशी वानवडीतील जगतापनगर परिसरातून 25 मार्च रोजी निघाले होते. रस्त्यात त्यांना भोवळ आल्याने ते पडले. नागरिकांनी त्यांना तातडीने वानवडीतील एका नामवंत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

हेही वाचा -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दीपक रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली. तेव्हा मृत भाऊ आकाश याच्या गळ्यात सोनसाखळी होती. त्यानंतर रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तेव्हा आकाश याच्या गळ्यात सोनसाखळी नसल्याचे आढळून आले.

अंत्यविधी आटोपल्यानंतर दीपक यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वॉर्डबॉय भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड (PSI Santosh Gaikwad) तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.