Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील मुख्य रस्ता असलेल्या स्व. सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे चौक (Late Golden MLA Rameshbhau Wanjale Chowk) ते गणपती माथा (Ganapati Matha, Warje Malwadi) या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून (PMC Road Department) हालचाली वाढल्या असल्याचे स्पष्ट होत असून, विकास आराखड्यानुसार (Warje Development Plan) रस्त्यात जात असलेल्या मिळकतींची (in Road Windening Properties) माहिती गोळा (Data Collection) करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
वारजे माळवाडी भागातील वाहतूक कोंडीने (Warje Traffic Jam) वारजे माळवाडी मधीलच नव्हे तर पुढील शिवणे (Shivane), उत्तमनगर (Uttam Nagar), कोंढवे धावडे (Kondhave Dhawade) आणि कोपरे (New Kopare) भागातील रहिवाश्यांसह पुढील सर्व गावांमध्ये राहणारे रहिवासी असतील की खडकवासला (Khadakwasla), पानशेत (Panshet), सिंहगडला (Sinhgad) येणारे पर्यटक (Tourist) असे सगळेच त्रस्त झाले असून, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना (Road Widening) होणार असल्याचे समोर येत आहे.
शुक्रवार दि. 24 मार्च 2023 रोजी वारजे माळवाडी मध्ये पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग (PMC Building Permit Department), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा (Warje Karvenagar Ward Office) अतिक्रमण विभाग (Encroachment Department) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ही बाब प्रकर्षाने समोर आली होती आणि त्याबाबत फक्त आणि फक्त ‘चेकमेट टाईम्स’नेच सविस्तर वृत्त (Exclusive News Only on Checkmate Times) प्रसिद्ध केले होते.
त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आता दिसू लागला असून, वारजे माळवाडी मधील रस्त्यात जात असलेल्या मिळकतींचे मालक, मालकी आणि भाडेकरू यांची माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संकलित (Property Owners & Tenant Deta Collection by PMC) केली जाते आहे. ही माहिती संकलित करून, लवकरच पुढील मोठ्या कारवाईचे नियोजन (Planning of Road Winding) सुरु असल्याचे यातून स्पष्ट होत असून, या भागातील वाहतूक कोंडीतून लवकरच नागरिकांची सुटका होणार असल्याचे दिसत आहे.
तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या रुंदीकरणात फक्त बांधकामे अडथळा ठरत नसून, त्यामध्ये फेडरल बँकेच्या (Fedaral Bank Warje Malwadi) समोर असलेले एक जुने चिंचेचे झाड आणि कॅनॉल रस्त्याच्या चौकात (कै. दशरथ दांगट चौक) (Dashrath Dangat Chowk) असलेली जुनी मुतारी काढण्यासाठी मागण्यात आलेल्या परवानग्या देखील पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला मिळालेल्या असून, उद्यान विभागाकडून हे चिंचेचे झाड आणि बांधकाम विभागाकडून मुतारी हटवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा - Atikraman Karvai | वारजे माळवाडी मधील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण महिन्यात होणार?; मोठ्या कारवाईचे संकेत
हे दोन मुख्य अडथळे हटले तरी या भागातील वाहतूक वेगवान होण्यास मोठी मदत होणार असल्याचे या भागातील वाहतूक विषयाच्या अभ्यासकांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. तर रस्ता रुंदीकरणासाठी माहिती संकलित केली जात असल्याची माहिती समजल्यानंतर वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, रस्ता रुंदीकरणासाठी लवकरात लवकर मुहूर्त लावण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक सचिन दोडके (Sachin Dodke) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पुणे महानगरपालिकेत आयुक्त विक्रम कुमार (PMC Commisioner Vikram Kumar) यांच्याबरोबर बैठक घेत, कोथरुड ते बहुली हा राज्य महामार्ग क्रमांक 113 असून (Kothrud Bahuli State Highway No. 113), तो कागदोपत्री 100 फूट रुंदीचा आहे. इंग्रज राजवट (British Govt Roads in Pune) असताना सन 1918 साली या रस्त्याचे 80 फुट रुंद रस्त्याचे हस्तांतरण (Transfer) झाले. मात्र पुणे महानगरपालिकेने 23 वर्षापासून ताब्यात असलेल्या 80 फुटी रस्त्यावरची अतिक्रमणे (Encrochment) अद्याप काढली नसल्याने नित्याची वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
तर या बैठकीनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोडके यांच्यासह वारजे माळवाडी मधील मुख्य रस्ते आणि सर्व्हिस रस्त्याची पाहणी करत, तातडीने अतिक्रमणे काढण्याची तयारी केली होती. त्यानंतर या एकाच आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या पथकांनी वारजे माळवाडी मध्ये कारवाईचे सत्र अवलंबले असून, काही पत्राशेड आणि पक्क्या बांधकामांना अधिकाऱ्यांकडून एक आठवड्यापासून, एक महिन्यापर्यंत काढून घेण्याची मुदत दिली गेल्याचे पाहायला मिळाले होते.
हेही वाचा - Warje Crime: वारजे मध्ये अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला भाजी विक्रेत्यांची मारहाण; चार जण गजाआड
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84