Type Here to Get Search Results !

Whatsapp Down: जगभरात व्हॉट्सअपची गंडल; नेटकऱ्यांची ट्विटरवर टीवटीव

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

whatsapp down tweeter tweets - checkmate times

पुणे, दि. 17 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भारतासह जगातील अनेक देशांमध्ये व्हॉट्सअॅप सेवा बंद (WhatsApp Down) झाली आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि स्टेटस डाऊनलोड होत नाहीत. याशिवाय व्हिडिओ पाठवतांनाही अडचण येत आहे. व्हॉट्सअॅपच्या सेवेवर नाराज असल्याने लोक ट्विटरवर ट्विट (Whatsapp Tweeter Tweets) करत आहेत.

DownDetector या वेबसाइटवरही व्हॉट्सअॅप डाऊनची माहिती देण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप काम करत नसल्याच्या तक्रारी अनेक युजर्सनी केल्या आहेत.

Downdetector च्या मते, 42 टक्के वापरकर्त्यांना अॅप चालवताना त्रास होत आहे. 41 टक्के वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या नोंदवल्या आहेत, तर 17 टक्के वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. 16 एप्रिलपासून ही समस्या येत असल्याच्या तक्रारी वापरकर्ते करत आहेत. (WhatsApp Down)

हेही वाचा -

व्हॉट्सअॅप यूजर्सनी आपल्या समस्या व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील बहुतेक वापरकर्त्यांनी व्हिडिओ डाउनलोड होत नसल्याची तक्रार केली आहे. (WhatsApp Down Some users face issues while downloading videos)

व्हॉट्सअॅपने अद्याप आउटेज किंवा अॅप चालवण्यात आलेल्या समस्येवर काहीही सांगितलेले नाही. असेही होऊ शकते की, ही समस्या फक्त व्हॉट्सअॅप बीटावर आहे. कंपनी बीटा आवृत्तीवर नवीन व्हिडिओ मेसेज फिचर्सची चाचणी करत आहे. वापरकर्ते WhatsApp वेब किंवा WhatsApp डेस्कटॉपवरून व्हिडिओ डाउनलोड करू शकतात.

याबाबत एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये डाउनलोड होत नाही. आज इंटरनेट कनेक्शन फास्ट आहे, तरीही मला आज ही समस्या भेडसावत आहे.

आणखी एका युजरने व्हॉट्सअॅप व्हिडिओ डाउनलोड होत नसल्याची तक्रार केली आहे. युजरने लिहिले की चॅट आणि स्टेटस दोन्हीचे व्हिडिओ डाउनलोड होत नाहीत. (WhatsApp Down)

एका यूजरने दावा केला आहे की, 14 एप्रिल 2023 रोजी व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये समस्या आहे. वापरकर्त्याने ते लवकर दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.