Type Here to Get Search Results !

Maharashtra Kesari: पहिली महिला महाराष्ट्र केसरी “प्रतिक्षा बागडी”च्या उपस्थितीत धायरी मध्ये महिला कुस्ती स्पर्धांचे आयोजन

 खालील लिंक वर क्लिक करा 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

woman wrestling competition in dhayari pune - checkmate times

पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वसंतराव सयाजी बेनकर (Vasantrao Sayaji Benkar Second Death Anniversary) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पहिल्यांदाच महिलांनी महिलांसाठी महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धेचे (Woman Wrestling Competition) आयोजन केले. महिला आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी (First lady Maharashtra Kesari Pratiksha Bagdi) यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यासाठी आपल्या पैलवान वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या तिन्ही लेकींनी मिळून या स्पर्धेचे भव्य आयोजन केले, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. आयोजक वैजयंतीमाला वसंतराव बेनकर (Vyjayantimala Vasantrao Benkar) यांचे कौतुक वक्त्यांनी केले. रुपाली चाकणकर यांनी कै. वसंतराव बेनकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रथम सत्रात राधाकृष्ण गार्डन, आंबेगाव, कात्रज (Radhakrishna Garden, Ambegaon, Katraj) येथे प्रकाश महाराज साठे (बीड) महाराजांचे किर्तन (Prakash Maharaj Sathe) पार पडले. द्वितीय सत्रात 14 वर्षाखालील आणि 17 वर्षापर्यंतच्या महिला कुस्तीपटूंच्या कुस्त्या उत्साहात झाल्या. जिल्हास्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत (District Level Girls Wrestling Tournament) खेळाडू निवडीसाठी तालुकास्तरीय निमंत्रित एक लाख 31 हजार रोख इनामाची स्पर्धा उत्साहात झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुस्तीगीरांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देऊन यथोचित सन्मान करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला सुनिता भगत, मंजिरी धाडगे, रोहिणी रासकर, संगीता कुदळे, स्वाती पोकळे, प्रभावती भुमकर, भाऊसाहेब डोके, राजेंद्र बोरावके, मयुरेश वांजळे, धनंजय बनकर, वस्ताद सुभाष पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सारिका डोके, दुर्गा बोरावके, गौरी पिंगळे यांच्यासह महेंद्र डोके, कपिल बोरावके, अक्षय पिंगळे संदीप वांजळे, मंगेश ससाणे यांनी मोलाचे योगदान दिले.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.