Type Here to Get Search Results !

वाचाल तर वाचाल; पुस्तक दिन साजरा केला जातो खरा, पण का? कधीपासून, कोणामुळे हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख वाचाच

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

world book day 2023 - checkmate times

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुस्तकाला माणसाचा मित्र मानले जाते. पुस्तक वाचन ही एक चांगली सवय आहे. वाचनाने आपल्या ज्ञानात वाढ होते. अशा या पुस्तकांसंदर्भात आज महत्त्वाचा दिवस आहे. त्यानुसार जगात आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन (World Book Day) साजरा करण्यात येत आहे.

पुस्तक दिन साजरा करण्यास 1995 साली सुरुवात झाली. युनेस्कोने (UNESCO) 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन तसेच कॉपीराइट दिन साजरा करण्याची घोषणा केली. 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागचे कारण असे की, जगातील अनेक प्रमुख लेखकांचा मृत्यू किंवा जन्म हा 23 एप्रिल या दिवाशी झाला आहे. त्यांचा स्मरणार्थ हा दिवस पुस्तक दिनम्हणून साजरा करण्यात येतो. विल्यम शेक्सपियरचा William Shakespeare) मृत्यू तसेच मॅन्युएल मेजिया वलेजोचा (Manuel Mejia Vallejo) जन्म हा 23 एप्रिल रोजीच झाला होता. त्यानुसार हा दिवस साजरा केला जातो. युनेस्कोच्या एका सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. जगभरातील लेखकांना सन्मान देण्याचा या मागचा उद्देश आहे.

जागतिक पुस्तक दिन 2023 ची थीम ‘Indigenous Languages’ म्हणजे देशीय भाषाआहे. ही थीम समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि साहित्य आणि कथाकथनमध्ये देशी भाषांचे महत्त्व अधोरेखित करते.

जगात वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तक दिन साजरा केला जातो. काही ठिकाणी पुस्तके वाटण्यात येतात, काही ठिकाणी वाचन स्पर्धा घेण्यात येते तर काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयात लेखन स्पर्धा घेतली जाते. साक्षरता वाढत लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा त्या मागचा उद्देश आहे.

 हेही वाचा -

सध्याच्या आधुनिक युगात लोकांमधील पुस्तक वाचनाची गोडी कमी होत आहे. इंटरनेटवर पाहिजे असेल ती माहिती सहज उपलब्ध होत असल्याने लोक पुस्तकांपासून दूर जात आहे. आजच्या तुलनेत पूर्वी माहिती मिळविण्यासाठी पुस्तक हेच एकमेव प्रभावी साधन होते. त्यामुळे लोक तासंतास पुस्तक वाचत होते. बहुतांश लोकांच्या घरात पुस्तकांचा संग्रह असायचा. मात्र आता परिस्थिती बदलली असून पुस्तकांची जागा आता मोबाईल आणि इतर गॅझेटने घेतली आहे. ही परिस्थिती दूर सारत लोकांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जात आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.