Type Here to Get Search Results !

World Earth Day 2023: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे; जाणून घ्या जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्याचे कारण

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

World Earth Day 2023 - checkmate times

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): आज जागतिक पृथ्वी दिन (World Earth Day 2023) जगभर साजरा केला जात आहे. जगातील 195 देश हा उत्सव साजरा करतात. ती पृथ्वी जी एक आपले घरच आहे आणि तिला आईच्या स्वरूपात ओळखले जाते कारण ती आपल्या सर्वांना सांभाळणाऱ्या, आपल्याला पोषण देणाऱ्या पृथ्वीची परिस्थिती दिवसेंदिवस दयनीय होत आहे. ओझोनचा थर भेदला गेला आहे, हवामान बदलत आहे, मानव पृथ्वीशी निगडित कर्तव्य न बजावत पळत आहे, म्हणूनच जगभरातील सर्व लोकांचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक पृथ्वी दिन आयोजित केला आहे.

यंदाच्या जागतिक पृथ्वी दिनाची थीम "Invest in Our Planet" अशी आहे. म्हणजे 'आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा'. या थीमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे असे आहे. याआधी 2022 साली जागतिक पृथ्वी दिनाची थीम होती 'आमची पृथ्वी पुनर्संचयित करा'. दरवर्षी आयोजकांकडे एक नवीन विषय असतो.

पहिल्यांदा जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्याची कल्पना अमेरिकन सिनेटचा सदस्य गेलर्ड नेल्सन (US Senator Gaylord Nelson) यांच्या मनात आली आणि 22 एप्रिल 1970 रोजी प्रथमच जागतिक अर्थ दिन साजरा करण्यात आला. नंतर हा दिवस साजरा करण्याचा निर्णय अनेक देशांनी स्वीकारला. पृथ्वी आणि लोकांमध्ये नैसर्गिक समतोल राखण्यासाठी आणि तिचा सन्मान करण्यासाठी या दिवसाची सुरुवात नेल्सन यांनी केली होती. त्यांनी लोकांना हा संदेश दिला की जर मनुष्याला पृथ्वीवर जगायचे असेल तर त्यांनी पृथ्वीबद्दल विचार केला पाहिजे.

पृथ्वीवर लोकसंख्या वाढत असताना, प्रदूषण, नैसर्गिक स्त्रोतांचे शोषण, वाढते असंतुलन यामुळे पृथ्वीवर राहण्याची जागा नसेल आणि हा दिवस फार दूर नाही, म्हणूनच सर्व लोकांनी योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे. लोकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या समजून त्यांचे कर्तव्य बजावले पाहिजेत. या ध्येयासह गेल्या 50 वर्षांपासून जागतिक पृथ्वी दिन संपूर्ण जगात साजरा केला जात आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.