Type Here to Get Search Results !

World Intellectual Property Day 2023: बौद्धिक संपदा दिवस; हा प्रकार नक्की काय?

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

World Intellectual Property Day 2023 - checkmate times

पुणे, दि. 26 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): आज म्हणजेच 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस (World Intellectual Property Day 2023) साजरा केला जातो. बौद्धिक संपदा (Intellectual Property) हा संपत्तीचा एक प्रकार आहे. संपत्ती म्हणजे एक अशी गोष्ट आहे की, ज्यावर त्या व्यक्तीचा संपूर्ण अधिकार किंवा हक्क आहे. बौद्धिक संपदेमध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, डिझाईन, ट्रेड सिक्रेट (patent, trademark, design, copyright, trade secret, design) यांचा समावेश होतो. बौद्धिक संपदा ही अदृश्य स्वरूपाची संपत्ती आहे.

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने 2000 मध्ये बौद्धिक संपदा अधिकार (पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि नावीन्य आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी डिझाइन) आणि जगभरातील दैनंदिन जीवनातील भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवसाची स्थापना केली होती.

शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Scientist Dr. Raghunath Mashelkar) यांनी हळदीच्या पेटंटसाठी केलेला संघर्ष आपण ऐकलेला आहे. पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन हे बौद्धिक संपदेचे प्रकार खास करून औद्योगिक उत्पादनाशी संबंधित आहेत, तर कॉपीराईट हा प्रकार संगीत, कला, लेखन, साहित्य यांच्याशी संबंधित आहे. भौगोलिक सूचकांक हा प्रकार विशिष्ट प्रदेशातील वस्तूंसाठी वापरला जातो. उदा. - कोल्हापुरी गूळ.

WIPO ही संयुक्त राष्ट्रांच्या 15 विशेष एजन्सीपैकी एक आहे. त्याची स्थापना 14 जुलै 1967 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland) येथे आहे. भारत WIPO चा सदस्य आहे आणि WIPO द्वारे प्रशासित अनेक करारांचा पक्ष आहे.

सन 1800 च्या दशकात बौद्धिक संपदा हक्कांच्या जागतिक संरक्षणाची कल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली गेली. वेगवेगळ्या शोधांची आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण हा मुख्य उद्देश होता; परंतु परिषदेमध्ये कोणत्याही देशाने पुढाकार घेतला नाही. 1883 मध्ये पॅरिस अधिवेशनाने अधिकार क्षेत्रामध्ये स्पष्टता आणि सहकार्य आणले. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1886 मध्ये बर्न अधिवेशनामध्ये लिखित अभिव्यक्तींना समान संरक्षण दिले. अर्ध्या दशकातच माद्रिद प्रोटोकॉलद्वारे ट्रेडमार्कला आंतरराष्ट्रीय संरक्षण देण्यात आले. त्यानंतर ही संस्था 1960 मध्ये जीनिव्हा येथे स्थलांतरित झाली आणि 1967 मध्ये युनायटेड नेशन्सची एजन्सी म्हणून कराराद्वारे जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करण्यात आली.

हेही वाचा -

बौद्धिक संपदा अधिकारामुळे एखाद्या व्यवसायाला किंवा वस्तूला एक वेगळेपण प्राप्त होते आणि त्यामुळेच कोणत्याही ब्रँडचा एक महत्त्वाचा फायदा असतो की, ग्राहकांच्या मनामध्ये ब्रँडबद्दल गुणवत्ता आणि दर्जासाठी एक आदरयुक्त भावना असते; ज्याला ब्रँड लॉयलटी (Brand Loyalty) असेही म्हणू शकतो, त्यामुळे ब्रँडसोबतच व्यवसाय वाढत जातो.

बौद्धिक संपदा अधिकार एखाद्या व्यक्तीला किंवा औद्योगिक संस्थेला त्याची कला, तंत्रज्ञान, सर्जनशीलता, ज्ञान यांना कायदेशीर सुरक्षा प्राप्त करून देण्यासाठीच तयार केला गेलेला आहे.

बौद्धिक संपदा अधिकारामुळे एखाद्या व्यवसायाला किंवा ब्रँडला मर्यादित कालावधीसाठी त्या वस्तूचे स्वामित्त्व मिळते. त्यामुळे इतर कोणालाही त्याचे उत्पादन करण्याचा अधिकार राहत नाही आणि व्यवसायवृद्धीने संबंधित संस्था मोठा मार्केट शेअर काबीज करू शकते.

बौद्धिक संपदा अधिकार हे अशा प्रकारचे अधिकार आहेत की, ज्यामुळे व्यावसायिक स्तरावर इतरांना त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी प्रतिबंध घातला जातो. परिणामी बाजारामध्ये तुमच्या वस्तूचे वर्चस्व वा स्वामित्त्व निर्माण होते आणि यामुळे निश्चितच व्यावसायिक वृद्धी साधते.

1800 ते 1889 च्या काळामध्ये संपूर्ण युरोपीय देशांमध्ये बौद्धिक संपदा कायदे अमलात आणले गेले. 1856 मध्ये पहिल्यांदा भारतातही बौद्धिक संपदा कायदा लागू केला गेला आणि 50 वर्षे पुढे विनाबदल लागू राहिला आणि अखेर 1911 साली नव्याने द इंडियन पेटंट्स अँड डिझाईन अ‍ॅक्ट 1911 नावाने संमत झाला. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या सर्व्हेनुसार 2020-21 मध्ये 58,502 पेटंट भारतात दाखल केले गेले. ज्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 81 वरून 46 व्या क्रमांकापर्यंत वधारलेला आहे.

“भारताने अलीकडेच नव्या राष्ट्रीय बौद्धिक मालमत्ता अधिकार धोरणाला मान्यता दिली. त्याची राष्ट्रीय घोषणा ‘क्रिएटिव्ह इंडिया इनोव्हेटिव्ह इंडिया’ ही आहे. भारताचे छखझठ धोरण हे बौद्धिक मालमत्तासंबंधित आस्थापना आणि संस्था यांच्या सर्व प्रकारच्या दरम्यान सहयोग तयार करणे आणि सहकार्य करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सद्यःस्थितीत भारतामध्ये बौद्धिक संपदेचा विचार करता भारत जागतिक स्तरावर प्रगती करताना दिसून येत आहे. मात्र, जर आपणास विकसित देश म्हणून वाढायचे असेल तर मात्र प्रचंड वेगाने आणि धोरणात्मक बदल करत आणि स्वीकारत वाटचाल करावी लागेल, तरच आपण बौद्धिक संपदेच्या बाबतीतही प्रगती करू शकतो.” असे अमित महाजन यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.