Type Here to Get Search Results !

Pune Crime: तरुणीशी हॉटेल मध्ये झालेली ओळख पडली महागात; व्यावसायिकाला 17 लाखांचा चुना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

young woman defrauded businessman for lakhs of rupees - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): व्यवसायाबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका तरुणीने व्यावसायिकासोबत फोटो काढून या तरुणीचा वकील मित्र आणि तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल (Fraud) करण्याची धमकी (Threatening to file a case of rape) देत व्यावसायिकाकडून 17 लाख 50 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत मगरपट्टा सिटी (Magarpatta City) येथील 42 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम भाटे (Vikram Bhate) (वय 35, रा. हडपसर) याच्यासह एका 25 वर्षीय तरुणीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar) वकिलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक हे 3 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या मित्र-मैत्रिणीसोबत सीझन मॉल (Seasons Mall) येथील रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी एका तरुणीने लायटरच्या बहाण्याने फिर्यादीसोबत ओळख करुन घेतली. ‘मी मुंबईहून आली असून, बिझनेससाठी तुमची मदत लागेल’, असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तिने ओळख वाढवून फिर्यादीसोबत व्हॉटसअ‍ॅप कॉल (Whatsapp Call) सुरु केले. (Pune Crime News)

हेही वाचा - Pune Crime News: तंबाखू व्यापाऱ्याला भर दिवसा ४७ लाखांचा लावला चुना; पुण्यातील धक्कादायक घटना

या तरुणीने 7 नोव्हेंबर 2022 रोजी फिर्यादीला व्हॉटसअप कॉल करून बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे सांगून घरी बोलावले. त्यावेळी दोघांनी सोबत फोटो काढले. त्यानंतर तरुणीच्या वकिलाने कार्यालयात बोलावून घेतले. आरोपींनी ‘तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी कारागृहात पाठवू, तसेच जामीनही मिळू देणार नाही’, अशी धमकी दिली. त्यावर सोन्याचे दागिने गहाण ठेवून व्यावसायिकाने काही रक्कम दिली. त्यानंतर पुन्हा वेळोवेळी 17 लाख 50 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.