पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 10 मे 2023 (चेकमेट टाईम्स): लष्करात सैनिक असल्याची बनावट कागदपत्रे (Fraud Documents) दाखवून ऑनलाइन खरेदी-विक्री साइटवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या ‘मिलिटरी इंटेलिजन्स’ने (Millitary Intelligence) ताब्यात घेतले आहे.
संजीवकुमार (वय 30) (Sanjeevkumar) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या सहकार्याने तोतया सैनिक आणि सायबर गुन्ह्यात तरबेज असलेले त्याचे साथीदार जेरबंद करण्यात यश आले आहे. (Pune Crime News)
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, संजीवकुमार दीपक बजरंग पवार या (Deepak Bajrang Pawar) नावाने आपली ओळख करून देत होता. दीपक पवार या सैनिकाची कागदपत्रे मिळवून त्यावरून बनावट दाखले तयार करून संजीवकुमारने ओळख निर्माण केली होती.
त्यानंतर तो शहरांमध्ये फ्लॅट भाड्याने देणाऱ्या, खरेदी-विक्री करणाऱ्या; तसेच विविध वस्तूंची खरेदी-विक्री होणाऱ्या वेबसाइटवर वस्तू, फ्लॅटचे फोटो टाकायचा. सैनिक असल्याचे भासवत असल्याने त्याच्यावर लोकांनी डोळे झाकून विश्वास टाकला. त्यामुळे तो ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण करून ‘ओटीपी’ मागत असे. ‘ओटीपी’ आल्यानंतर क्षणात नागरिकांच्या खात्यातून पैसे काढले जायचे. (Pune Crime News)
अशा साठहून अधिक नागरिकांना गंडा घातल्यानंतर पुण्यातील ‘मिलिटरी इंटेलिजन्स’ने त्याचा माग काढून अटक केली. संजीवकुमार आणि साथीदारांकडून बनावट लष्करी ओळखपत्र, कँटिन कार्ड, पॅन, आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाइल, 206 सीमकार्ड आणि सात लॅपटॉप जप्त करण्यात आले.
लष्कराचे जवान, अधिकारी असल्याचे सांगून अर्थिक फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या देशात सक्रिय असल्याची शक्यता ‘मिलिटरी इंटेलिजन्स’कडून व्यक्त करण्यात आली आहे. दिवसेंदिवस यांचा धूमाकूळ वाढत असून, सायबर गुन्हे (Cyber Crime) घडवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्याकडून केला जात आहे, असेही ‘इंटेलिजन्स’कडून स्पष्ट करण्यात आले. (Pune Crime News)
“‘ओएलएक्स’ सारख्या ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाइटवर लष्कराचे जवान असल्याचे सांगून अनेकदा घरातील वस्तू, वाहने विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. सततच्या बदल्यांमुळे जवानांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. त्यामुळे त्यांचे नाव सांगून व्यवहार केल्यास सामान्य नागरिकांचा त्यावर चटकन विश्वास बसतो आणि ते फसतात. नागरिकांनी अशा वेबसाइटवर खरेदी-विक्री करताना खातरजमा करून संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून वस्तूची पाहणी करून मगच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावेत.” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84