Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (Maharashtra Sahitya Parishad - MSP) देण्यात येणारा आणि ज्येष्ठ भाषा अभ्यासक व लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ (Masap Lifetime Achievement Award) यंदा ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले (Senior writer Achyut Godbole) यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Executive Chairman of the Council Prof. Milind Joshi) यांनी दिली.
या पुरस्कारासह ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ (Dr. Bhimrao Kulkarni Worker Award) मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी (President of Muslim Satyashodak Mandal Prof. Dr. Shamsuddin Tamboli) यांना जाहीर झाला असून 11 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे पुरस्कार 27 मे 2023 रोजी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात (Madhavrao Patwardhan Hall) वर्धापनदिन समारंभात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत (Dr. Vivek Sawant) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ‘मसाप’चे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
संगणकापासून नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत, व्यवस्थापनापासून संगीतापर्यंत, अर्थशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या गोडबोले यांनी मराठीतील ज्ञानलक्ष्यी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. डॉ. तांबोळी यांनी साहित्य चळवळीतून धार्मिक सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविधांगी प्रयत्न करून समाजजागरण केले आहे, असे प्रा. जोशी (Prof. Joshi) यांनी सांगितले.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84