पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 10 मे 2023 (चेकमेट टाईम्स): दौंड शहर (Daund) व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल (Pune Rural Police Force Superintendent Ankit Goyal) यांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोळीकडून गोहत्या, गोवंश हत्या करून मांसाची वाहतूक आणि विक्री सातत्याने केली जात होती. पोलिसांना संशय येऊ नये, याकरिता टोळीकडून गोमांस वाहतुकीसाठी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (Sports utility vehicle – SUV) वाहनांचा वापर केला जात होता. दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील (Daund Police Station Inspector Bhausaheb Patil) यांनी या बाबत माहिती दिली.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस हद्दीसह नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुका हद्दीतून टोळीला यांना 6 मे 2023 पासून एका वर्षाकरिता तडीपार केले आहे.
अधीक्षक अंकित गोयल यांनी दौंड पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, टोळीचा म्होरक्या अश्पाक उर्फ लाला कासम कुरेशी (वय 42) याच्यासह आसिफ कासम कुरेशी (वय 41), वाजीद सादिक कुरेशी (वय 28), कय्युम शब्बीर कुरेशी (वय 35), बाब्या उर्फ इमरान इब्राहिम कुरेशी (वय 35), इद्रिस आबिद कुरेशी (वय 40) व तन्वीर ईस्माईल कुरेशी (वय 23, सर्व रा. कुरेशी मोहल्ला, खाटीक गल्ली, दौंड) यांना तडीपार करण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भाऊसाहेब पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, उप निरीक्षक सतिश राऊत, हवालदार महेश बनकर, पोलीस नाईक शरद वारे, कॉन्स्टेबल सागर गलांडे व योगेश गोलांडे यांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा -
(Ashpak aka Lala Qasm Qureshi along with Asif Qasm Qureshi, Wajid Sadiq Qureshi, Qayyum Shabbir Qureshi, Babya aka Imran Ibrahim Qureshi, Idris Abid Qureshi and Tanveer Ismail Qureshi, Additional Superintendent of Police Anand Bhoite, Deputy Superintendent Rahul Dhas, Inspector Bhausaheb Patil, Local Crime Investigation Branch Inspector Avinash Shilimkar, Sub-Inspector Satish Raut, Constable Mahesh Bankar, Police Naik Sharad Ware, Constable Sagar Galande and Yogesh Golande.)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes