Type Here to Get Search Results !

PMC: महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदनाला दांडी मारणाऱ्या पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

action against pmc employees who were absent on one may flag hosting program - checkmate times

पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या (Maharashtra State Foundation Day) निमित्ताने पुणे महापालिकेत (PMC) ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारती मधील सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमासाठी अवघे 200 कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार,’महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थिती अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान 10 मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. या कार्यक्रमास उपस्थित असलेले अधिकारी आणि सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता 4 मे 2023 पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा.’ असा आदेश देण्यात आला होता.

तसेच ‘ज्या अधिकारी आणि सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे. तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान 10 मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे.’ असेही आदेशात म्हटले होते.

तरीही या कार्यक्रमासाठी अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioners) अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.