पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 5, 2023
पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): शिवणे, उत्तमनगर भागातील अमोल कारले लेन (Amol Karle Lane, shivane, uttamnagar) मध्ये आमदार निधीमधून 10 लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेला तो निकृष्ठ दर्जाचा रस्ता (Bad Quality Roads) फोडून पुन्हा नव्याने बनवण्यात आला आहे. यासाठी माजी स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे नागरिकांना मात्र नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, त्या ठेकेदाराने बनवलेल्या इतर रस्त्यांचा देखील दर्जा तपासण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत.
हा पहा व्हिडीओ -
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर (Bhimrao Tapkir MLA of Khadakwasla Assembly Constituency) यांच्या निधीमधून नुकतेच खडकवासला विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. त्यातील शिवणे, उत्तमनगर, वारजे भागातील अनेक सिमेंटचे रस्ते निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत.
अशाच प्रकारे शिवणे, उत्तमनगर भागातील अमोल कारले लेन मध्ये काही दिवसांपूर्वी सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनवण्यात आला. मात्र तो एवढा निकृष्ठ दर्जाचा झाला की, दुचाकी गाड्या गेल्या तरी सिमेंटचा फुफाटा उधळत होता. मात्र काम नवीन असल्याने ते उडत असेल म्हणून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाने रस्त्याची लायकीच उघडी पाडली. तर पावसाळ्यानंतर इथे सिमेंटचा रस्ता केला होता का? असा प्रश्न निर्माण झाला असता. यानंतर नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माजी स्वीकृत सदस्य सचिन विष्णुपंत दांगट यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्यावर, सचिन दांगट यांनी हा रस्ता आमदार भिमराव तापकीर याच्या माध्यमातून पुन्हा नव्याने करून घेतल्याचे समोर आले आहे.
मात्र अगोदर काही दिवस रस्ता बंद होता. आता पुन्हा रस्ता खोदाई आणि नव्याने करण्यासाठी बंद करण्यात आला आहे. त्यातच या गल्लीतून सरडे बाग (Sarde Bag) भागात चालत जाण्यासाठी असलेली पायवाट देखील तिकडील मालकाने खाजगी जागा असल्याने बंद केल्याने या भागात राहणाऱ्या रहिवाश्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येथील रहिवाश्यांनी ‘चेकमेट टाईम्स’कडे केल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी हा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराने खडकवासला विधानसभा मतदार संघात केलेल्या सर्व कामांच्या दर्जाची तपासणी करा अशी मागणी केली आहे. मात्र त्याला कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत सचिन दांगट यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमदार भिमराव तापकीर हे आपल्या भागातील पुणे महानगरपालिकेचे असेल, की आमदार निधीचे काम असेल, ते काम उत्कृष्ठ दर्जाचेच व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतात. या रस्त्याच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यानंतर आपण तत्काळ आमदार तापकीर यांच्यासह अधिकारी आणि ठेकेदारांकडे तक्रार केली. यानंतर आमदार तापकीर यांच्या आदेशानुसार रस्ता दुरुस्त न करता, नव्याने करून घेतला आहे. हा रस्ताच नव्हे तर आपल्या भागातील सर्व रस्ते दर्जेदार असतील, याची आपण काळजी घेतली असल्याचे दांगट यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84