Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे वनविभागाच्या अखत्यारित (Pune Forest) असलेल्या इंदापूर, वडगाव मावळ, पुणे, पौड, शिरोता, बारामती, भांबुर्डा, दौंड (Indapur, Vadgaon, Maval, Pune, Paud, Shirota, Baramati, Bhamburda, Daund) या आठ वनपरिक्षेत्रामध्ये तयार केलेल्या पाणवठयाच्या ठिकाणी लाकडी मचाण तयार करून वैशाख बुध्द पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात ‘निसर्गानुभव- 2023’ या उपक्रमांतर्गत प्राणीगणना करण्यात आली. यामध्ये रात्रभर जागे राहून वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने 22 प्रजातीच्या 313 वन्यप्राणी (प्राणी पक्षी) यांच्या हालचालीची नोंद घेण्यात आली.
पुणे वनविभाचे भौगोलिक क्षेत्र 7 हजार 831 चौकिमी आहे. त्यातील वनक्षेत्र 873.24 चौकिमी इतके आहे. त्यामध्ये 5 मे 2023 रोजी पुणे वनविभागाअंर्तगत ‘निसर्गानुभव- 2023’ कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी पुणे वनवृत्तातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
यामध्ये प्रामुख्याने चिंकारा, लांडगा, तरस, खोकड, ससा, वानर, रानडुक्कर, भेकर, सांबर, मोर, साळिंदर, कोल्हा, धामणसाप, रानकोंबडा, माकड, चितळ, हरिण, घार, पोपट, मुंगुस, टिटवी, रानमांजर यासारख्या प्राणी पक्ष्यांचे दर्शन झाले. यामध्ये कोणकोणते प्राणी, पक्षी या परिसरात आहेत. त्यांची संख्या किती आहे याची माहिती मिळाली. तसेच सामान्यांना वणे व वन्यजीव याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने पुणे वन विभागाच्या वतीने निसर्गानुभव- 2023 हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक राहुल पाटील (Chief Conservator of Forest N. R. Praveen, Conservator of Forests Rahul Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, सहायक वनसंरक्षक मधुर बोटे, सहायक वनसंरक्षक दिपक पवार व सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्रिय कर्मचारी यांच्या सहकार्याने (Pune) पार पडला. (Assistant Conservator of Forest Ashutosh Shendge, Assistant Conservator of Forest Madhur Bote, Assistant Conservator of Forest Deepak Pawar)
एका रात्रीत पाणवठ्यांवर आढळले प्राणी, पक्षी –
चिंकारा – 107
टिटवी – 7
लांडगा – 4
तरस – 3
खोकड – 6
ससा – 39
रान मांजर – 2
वानर – 12
रानडुक्कर – 47
भेकर – 30
हरीण – 5
घार – 3
मोर – 10
पोपट – 2
साळिंदर – 2
मुंगूस – 2
सांबर – 12
कोल्हा – 2
धामण (साप) – 1
रान कोंबडा – 3
माकड – 10
चितळ – 4
हेही वाचा -
(Chinkara, wolf, taras, jackal, rabbit, monkey, wild boar, sheep, sambar, peacock, salinder, jackal, snake, wild cock, monkey, chital, deer, ghar, parrot, mongoose, titvi, wild cat)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84