Type Here to Get Search Results !

Deepak Mankar: दीपक मानकर यांचा भाजपा आणि महागाईवर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

deepak mankar birthday - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर लोकसभेच्या संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक मानकर (Former Deputy Mayor and NCP corporator Deepak Mankar) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दीपक मानकर यांनी (Deepak Mankar Birthday) गायलेल्या भाजपा आणि महागाईवर टीका करणाऱ्या गाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अनेक मानकर समर्थकांच्या whatsapp स्टेट्सला हा व्हिडीओ या दिवसाचे औचित्य साधून ठेवण्यात आला होता.

हा पहा व्हिडीओ -

दीपक मानकर हे वारकरी संप्रदायात रमणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आवाजातील पसायदान ऐकताना वारकरी देखील मंत्रमुग्ध झाल्याचे अनेकांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर मानकर यांना जुनी हिंदी मराठी गाणी आणि कविता गाण्याचा छंद आहे. कधी कोणी खूपच आग्रह केला तर ते सार्वजनिक कार्यक्रमात अशी गाणी, कविता गुणगुणत असतात. अशाच प्रकारे कर्वेनगर मधील एका कार्यक्रमात मानकर यांनी गायलेल्या या गाण्याचा व्हिडीओ टायमिंग साधून व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शहरभर याच व्हिडीओची चर्चा असल्याचे पाहायला मिळाले.

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संसदेची प्रतिकृती असलेला केक आणि त्यावर भावी खासदार म्हणून असा उल्लेख करत समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap) यांच्यानंतर मानकर देखील पुणे शहर लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दोघांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात उभारण्यात आलेल्या फलकांवर दोघांचाही उल्लेख भावी खासदार असा केला गेलेला पाहायला मिळाला. त्यामुळे संभाव्य पुणे शहर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हा मतदार संघ कॉंग्रेस कडून राष्ट्रवादीकडे जातो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.