पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 10 मे 2023 (चेकमेट टाईम्स): कॅब पकडण्यासाठी धनकवडीतील कानिफनाथ चौकात (Kanifnath Chowk, Dhankawadi) आलेल्या पादचाऱ्याला एका भरधाव टेम्पोने उडवले. यात गंभीर जखमी होऊन (Accident) रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या व्यक्तीचे अपूर्वा ठाकरे नावाच्या (Apoorva Thackrey) एका अभियंता तरुणीच्या तत्परतेमुळे प्राण वाचले. त्यामुळे या तरुणीचे परिसरात कौतुक होत आहे. आदिनाथ शिरसाठ (वय 47, रा. आंबेगाव पठार) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. (Pune News)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, शिरसाठ हे खासगी कंपनीत नोकरी करतात. आंबेगाव पठार ते कानिफनाथ चौकदरम्यान बेकायदा पार्किंगमुळे नेहमीप्रमाणे शनिवारीही चालत ते कॅब पकडण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिली. त्यात शिरसाठ गंभीर जखमी (Seriously Injured) झाले. त्याचवेळी शंकर महाराज मठात सकाळी आरतीला जाणाऱ्या अभियंता अपूर्वा ठाकरे यांनी थांबून रुग्णवाहिका आणि पोलिसांना तत्काळ कळवले.
रुग्णवाहिका लवकर येत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी तेथील टेम्पोमधून शिरसाठ यांना घेऊन जात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्यामुळे शिरसाठ यांच्यावर वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले.
याविषयी अपूर्वा म्हणाली,“अपघात घडतो, तेव्हा लोक जमा होतात; मात्र आपत्कालीन स्थितीत काय करायचं याची माहिती नसल्यामुळे अथवा झंजट नको म्हणून पुढाकार न घेणाऱ्यामुळे अनेक जण जीव गमावतात. गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे त्याचवेळी पोलीस आणि रुग्णालयांनी अशा समाजसेवकांना सहकार्य केलं पाहिजे, तरच नागरिक मदतीला येतील. रस्त्याकडेला बेकायदा पार्किंगवर कारवाई झाली पाहिजे.” हे आवर्जून ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes